रत्नागिरी प्रतिनिधी :
दि. १५ एप्रिल २०२४
किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी काल (रविवारी) नागपूरला जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या जागेसाठी भेट घेतली. या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारीचा कुठलाही शब्द किरण सामंत यांना दिला नसल्याची माहिती आहे. किरण सामंत यांनी आपण शिवसेनेकडून नाही तर भाजपकडूनदेखील लढण्यास तयार आहोत असे सांगितल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सामंत यांना काही काळ शांत राहण्याच्या सूचना केल्या. शिवाय असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा निर्णय दिल्लीतून होईल, .
प्रत्यक्षात किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही आज उमेदवारी अर्ज घेतले. उमेवारी अर्ज नारायण राणे यांच्याकडूनदेखील घेण्यात आले आहेत. त्यामुळे या जागेवरील तिढा अजूनही सुटला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या जागेबाबतचा निर्णय त्यामुळे दिल्लीत होणार आहे.
किरण सामंत यांचे पदाधिकारी म्हणाले की, आम्ही अर्ज घेतला आहे कारण महायुतीचा उमेदवार असेल त्याचा प्रचार करण्याच्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे किरण सामंत यांना उमेवारी जाहीर झाली, तर तयारीत असावे म्हणून आम्ही अर्ज घेतले आहेत. कारण हा मतदारसंघ खूप मोठा आहे
उमेदवारीतून माघार घेत असल्याची पोस्ट किरण सामंत यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केली होती. मात्र, त्यांनी नंतर ती पोस्ट डिलीट केली. या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे असे त्यांचे बंधू मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आपल्यामुळे एकनाथ शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. मात्र, याविषयी आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी ती डिलीट केली. दरम्यान, राज्यस्तरावर ज्या जागांच्या संदर्भात महायुतीत निर्णय होत नाहीत. त्या जागांसंदर्भात अंतिम निर्णय अमित शाह घेणार आहेत. त्यामुळे तेच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात अंतिम निर्णय घेतील.