DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शाहरुखचं लेकीवर जिवापाड प्रेम!

सुहाना अभिनीत 'किंग' साठी करतोय कोट्यवधींचा खर्च

DD News Marathi by DD News Marathi
April 16, 2024
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
शाहरुखचं लेकीवर जिवापाड प्रेम!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल २०२४

अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या सिनेमांनंतर ‘किंग’ या सिनेमातून पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुजॉय घोष २०२५ मध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. शाहरुखची लेक सुहानासुद्धा या सिनेमातून मोठ्या स्क्रीनवर पदार्पण करतेय. हा सिनेमा उत्तम बनावा म्हणून सिनेमाची टीम जोरदार तयारी करत आहे. सध्या या सिनेमाच्या शूटिंगची पूर्वतयारी सुरु आहे.

तब्बल २०० करोड रुपये बजेट असलेला हा चित्रपट अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण आहे. या सिनेमाची निर्मिती सिद्धार्थ आनंद आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट करत आहेत. हा सिनेमा अॅक्शनने पुरेपूर भरलेला असून इंडस्ट्रीत अॅक्शनपटांसाठी एक वेगळं उदाहरण या सिनेमातून तयार होणार आहे असं’बॉलिवूड हंगामा’ चा रिपोर्टम्हणतो. सुहाना खान या सिनेमातून पदार्पण करणार असल्याने ही फिल्म भव्य आणि तितकीच उत्तम व्हावी असा प्रयत्न सिनेमाच्या टीमकडून करण्यात येतोय. सध्या, लेकीच्या मोठ्या स्क्रीनवरील पदार्पणासाठी शाहरुख खूप जास्त मेहनत घेत असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.

उत्तम व्हीएफएक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान या सिनेमासाठी वापरलं जाणार असून खास परदेशातील स्टंट दिग्दर्शक या सिनेमासाठी बोलावले असल्याची माहिती मिळते आहे. सिनेमाच्या शूटिंगला येत्या मे महिन्यात सुरुवात होणार असून पाच महिने या सिनेमाचं शूटिंग सुरु राहणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीस हा सिनेमा २०२५ च्या अखेरीस येईल असा अंदाज आहे.

दरम्यान, शाहरुख किंवा सुहानाने कोणतीही पोस्ट या सिनेमाबाबत शेअर केली नाहीये. तसेच याबाबत सिनेमाच्या टीमकडून सुद्धा कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘आर्चिज’ या सिनेमातून सुहानाने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. ख़ुशी कपूर, अगस्त्य नंदा यांचीही मुख्य भूमिका ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमात होती. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद या सिनेमाला मिळाला. या सिनेमावर टीकासुद्धा काहींनी केली होती. प्रेक्षकांचं मन जिंकण्यात पहिल्या सिनेमातून अयशस्वी ठरल्यानंतर सुहानाचा हा सिनेमा यशस्वी ठरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bollywood#King#ShahrukhKhan#SuhanaKhan
Previous Post

मोदींच्या हवेच्या फुग्यात कोणी राहू नका!

Next Post

आता पुण्यात होणार चौरंगी लढत!

Next Post
आता पुण्यात होणार चौरंगी लढत!

आता पुण्यात होणार चौरंगी लढत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.