DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आता पुण्यात होणार चौरंगी लढत!

AIMIM चा उमेदवार जाहीर झाल्याने धंगेकरांच्या अडचणी वाढणार.

DD News Marathi by DD News Marathi
April 17, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
आता पुण्यात होणार चौरंगी लढत!

पुणे प्रतिनिधी :
दि. १७ एप्रिल २०२४

पुण्यात आता लोकसभेची निवडणूक चौरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आता एमआयएम देखील पुण्याच्या मैदानात उतरली आहे. गेली पंचवीस वर्षे पुण्यातील राजकारणात सक्रिय असलेले अनिस सुंडके यांना ‘एमआयएम’ पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची एक प्रकारे डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुस्लिम मतांचं विभाजन सुंडके यांच्यामुळे होऊन भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.

‘एमआयएम’चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी हे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी संभाजीनगर येथे आले असता तेथे झालेल्या जाहीर सभेत पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिस सुंडके यांना अधिकृत उमेदवारी त्यांनी जाहीर केली.

खासदार ओवैसी म्हणाले, “आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत. निवडणूक लढविण्याची आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. पुणे लोकसभा निवडणुकीत ‘एआयएमआयएम’चे उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील अशी मला खात्री आहे.”

जय भीम-जय मीमचा नारा देत, पुणे लोकसभा मतदारसंघात, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार अनिस सुंडके यांनी केला आहे. अनिस सुंडकेंनी म्हटलं, “मी पुण्यातील राजकारणात गेल्या पंचवीस वर्षांपासून सक्रिय आहे. सर्व जाती-धर्मांशी माझे चांगले संबंध असून पुण्यातील अनेक प्रश्न मी मार्गी लावले आहेत. काँग्रेस पक्ष व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मी काम केलेले आहे. मी अनेक पदे पुणे महानगरपालिकेत भूषविलेली असून पश्चिम महाराष्ट्रात सर्व धर्मीय लोकांशी माझा चांगला संपर्क आहे. पुण्यासाठी अनेक विधायक कामे पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना मी केली आहेत.”

“विविध प्रश्नांची मला जाणीव असून समाजाच्या समस्यांचा मला अनुभव आहे. अनेक आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा ‘एआयएमआयएम’ पक्षात जाहीर प्रवेश होईल,” असा विश्वास अनिस सुंडकेंनी व्यक्त केला.

अनिस सुंडके हे माजी नगरसेवक तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांचे लहान बंधू रईस सुंडके माजी नगरसेवक होते तर हमिदा सुंडके या त्यांच्या पत्नी पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AIMIM#AnisSundake#AsaduddinOwaisi#PuneLokasabha2024#ravindradhangekar
Previous Post

शाहरुखचं लेकीवर जिवापाड प्रेम!

Next Post

“जनतेचं भलं बघायचं नाही, फक्त भाषणं ठोकायची!”

Next Post
“जनतेचं भलं बघायचं नाही, फक्त भाषणं ठोकायची!”

"जनतेचं भलं बघायचं नाही, फक्त भाषणं ठोकायची!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.