DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

इंदापूरात अजित पवारांची मिश्किल टिप्पणी.

राहूल गांधींचाही केला उल्लेख.

DD News Marathi by DD News Marathi
April 17, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
इंदापूरात अजित पवारांची मिश्किल टिप्पणी.

इंदापूर प्रतिनिधी :
दि. १७ एप्रिल २०२४

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता प्रचार सभांना आता वेग आला आहे. स्टार प्रचारक मतदारसंघात जाऊन विविध पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. ते अनेक मान्यवरांच्या गाठीभेटीही घेत आहेत. जास्तीत जास्त मतदान होऊन सर्वाधिक मतं पदरात पाडण्यासाठी स्टार प्रचारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. विविध मतदारसंघात जाऊन, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील नेते अजित पवार यांनीही तेथील उमेदवारांसाठी प्रचार केला. त्यांनी इंदापूर येथील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला आज सकाळीच भेट दिली. विरोधकांना टोला लगावत यावेळी त्यांनी भाषण केलं. तसंच, स्वतःच्या रेकॉर्डचाही खोचकपणे उल्लेख केला.

अजित पवार म्हणाले, माझ्या डॉक्टर आणि वकिल मित्रांनो एक त्रयस्थ भारतीय नागरीक म्हणून जर तुम्ही विचार केला, तर एका बाजूला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा चेहरा आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचा चेहरा आहे. काय दिसतं? आतापर्यंत काय काम केलंय राहूल गांधींनी? रामाचं मंदिर गेली ५०० वर्षे झालं नव्हतं. पण राम मंदिराचं स्वप्न अनेकांनी जपलं होतं, ते मोदींनी पूर्ण केलं.

पुढे अजितदादा खोचकपणे म्हणाले, सहावेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळा निवडूनही यावं लागतं “मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा अर्थमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री आहे. आम्ही महायुतीत सरकार चालवत आहोत. राज्यासाठी अनेक गोष्टी मी केल्या. मी आताही सरकारमध्ये कामासाठीच गेलो. सत्तेला हपापलेला माणूस मी नाही. अनेक वर्षे अनेक पदांवर मी होतो. मी उपमुख्यमंत्री पद पाच ते सहा वेळेला स्वीकारलं आहे. माझा रेकॉर्ड अनब्रेकेबल आहे असं मला वाटतं. सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यावं लागतं. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

त्यांनी उपस्थित डॉक्टरांबरोबरही मिश्किलपणे संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “तुम्ही सहजसुद्धा खूप काही काम करू शकता. माणूस डॉक्टरशी खरं बोलतो .कारण काय वेदना होतात हे सांगितल्याशिवाय त्यावर योग्य उपचार होऊ शकत नाहीत. त्याला उपचार करत असताना थोडंसं मनात काय आहे? कसं काय चाललंय? असं विचारा. त्यांनी आमचं नाव घेतलं तर खूप चांगली वागणूक द्या, दुसर्‍या कुणाचं नाव घेतलं तर असं इंजेक्शन टोचा की…”, पण पुढे ते सॉरी म्हणाले आणि मला असं काही म्हणायचं नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#Doctor#Indapur#RahulGandhi
Previous Post

“जनतेचं भलं बघायचं नाही, फक्त भाषणं ठोकायची!”

Next Post

पतंग कटण्याचे संकेत म्हणूनच अकोल्यात पाठिंब्याचं नाटक!

Next Post
पतंग कटण्याचे संकेत म्हणूनच अकोल्यात पाठिंब्याचं नाटक!

पतंग कटण्याचे संकेत म्हणूनच अकोल्यात पाठिंब्याचं नाटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.