DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मतदानाकरिता १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार!

पुरावा दाखवल्यानंतर करता येणार मतदान.

DD News Marathi by DD News Marathi
April 18, 2024
in राजकीय
0
या लोकसभेने दाखवून दिले, ‘पुणे तिथे काय उणे’!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १८ एप्रिल २०२४

२६ एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर १२ ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. मतदारांना, मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये छायाचित्रांसह ज्यांना मतदार ओळखपत्र म्हणजेच ‘ईपीक’ (EPIC) देण्यात आले आहे, ते मतदार, मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र सादर करतील.

परंतू ओळखपत्राव्यतिरिक्त, छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र नसणार्‍या मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी इतर १२ पुराव्या पैकी कोणताही एक पुरावा सादर करता येणार आहे.

मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी स्वत:ची ओळख पटवणार्‍या पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे दिलेले नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रांसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र अशी १२ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी, मतदान करायला जाताना मतदान केंद्रावर नागरिकांनी आपल्याकडील जे पुरावे असतील ते सोबत न्यावेत, असे आवाहन केले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ElectionCommission#EPIC3VOTING
Previous Post

विरोधक अन् मित्र असावा तर शिवतारेंसारखा!

Next Post

जामिनासाठी केजरीवालांची जेलमध्ये ‘शुगर पॉलिसी’!

Next Post
जामिनासाठी केजरीवालांची जेलमध्ये ‘शुगर पॉलिसी’!

जामिनासाठी केजरीवालांची जेलमध्ये 'शुगर पॉलिसी'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.