सोलापुर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०४ मे २०२१
पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक पुन्हा घ्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूकीत मोठ्या प्रमाणावर साम-दाम-दंड-भेद चा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामूळे निवडणूक आयोग या पत्राला काय उत्तर देतयं ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या मागणीमूळे ही पोटनिवडणूक पुन्हा होणार का ? असा प्रश्न पंढरपुर-मंगळवेढेकरांना पडला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापर करण्यात आला आहे. तेंव्हा या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची योग्य ती चौकशी करुन फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे ॲड. नितीन माने यांच्या वतीने याबाबतची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या पत्रातील प्रमुख मागण्याः
-प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे या दोन्ही कारखानाच्या तसेच कार्यालयाच्या आणि घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे.
-दोघांचे फोन रेकॉर्डिंग तपासावे.
-समाधान आवताडे यांच्या कंस्ट्रक्शन कंपनीचा पूर्ण ऑडिटचा तपास करण्यात यावा.
-निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही सदस्यांच्या प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे हे संचालक असणाऱ्या सर्व -संस्था, कारखान्यातील आणि कंस्ट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी.
-माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करण्यात यावी.
-समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी.
You are not right. I can prove it. Write to me in PM, we will communicate.