फतेपूर सिकरी प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२४
मुख्तार अन्सारीच्या कबरीला भेट देणाऱ्या नेत्यांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्ला चढवला. गाझीपूर येथे गँगस्टर मुख्तार अन्सारीची कबर आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फतेपूर सिकरी येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दाखल झाले होते. मुख्तार अन्सारीच्या कबरीसमोर झुकणार्यांना यावेळी त्यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, हे सगळे लोक एका माफियाच्या कबरीवर जावून फातिहा पठण करत आहेत. त्यांना सांगा की, ही वेळ चांगली नाही. कमाळालाच शेवटी लोक मतदान करणार आहेत. लोक आता तुम्हाला पाच वर्षांची सुट्टी देणार आहेत.. तेव्हा फाहिता पठण करत राहा.
कोणत्याही नेत्याचं अथवा आरोपीचं नाव यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी घेतलं नाही. मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या समाजवादी पार्टी, एआयएमआयएम, बसपा आणि काँग्रेसच्या गाजीपूर दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केली. ज्या लोकांनी प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णावर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांना आता मतदान होणार नाही असंही योगी आदित्यनाथांनी सुनावलं.