DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ठाण्यात आदित्य ठाकरेंचा फोटो जाळण्याचा झाला प्रयत्न!

बॅनरला 'जोडे मारो' आंदोलन.

DD News Marathi by DD News Marathi
April 23, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
ठाण्यात आदित्य ठाकरेंचा फोटो जाळण्याचा झाला प्रयत्न!

ठाणे प्रतिनिधी :
दि. २३ एप्रिल २०२४

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असल्याचा आरोप करत, त्याचा निषेध म्हणून, मंगळवारी दुपारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेनेने जोरदार घोषणाबाजी केली.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या बॅनरला ‘जोडे मारो’ आंदोलन केले.एवढेच नव्हे तर आदित्य ठाकरेंच्या फोटोला लिपस्टिक लावून त्या फोटोंचे तोरणही बनवण्यात आले आणि त्या फोटोंना फाडून जाळण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलिसांमुळे तो अयशस्वी ठरला.

मंगळवारी युवा सेनेने, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे आणि युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना स्टार प्रचारक राहूल लोंढे यांनी म्हटले की, सत्ता गेल्यापासून उध्दव आणि आदित्य ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे हे उच्च राहणी आणि वाईट विचारांचे आहेत. ते स्वतःला जेंटल समजतात परंतू ते मेंटल झाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांची भाषा बोलू लागले आहेत. यापुढे अशी वक्तव्यं आदित्य ठाकरे यांनी सुरूच ठेवली तर त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची युवासेना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. असेही लोंढे म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdityaThackeray#EkanathShinde#ThaneLokasabha#YuvaSena
Previous Post

अमरावतीत सभेच्या मैदानावरुन पोलिस अन् बच्चू कडूंमध्ये खडाजंगी!

Next Post

उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडल्याची मुख्यमंत्री शिंदेंची टीका!

Next Post

उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडल्याची मुख्यमंत्री शिंदेंची टीका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.