DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणेः खुनाच्या गुन्ह्यातील फरार शिवसेनेच्या माजी सरपंचास अटक

कात्रज परिसरातील नातेवाईक युवकाचा केला होता खुन

DD News Marathi by DD News Marathi
May 22, 2021
in ताज्या बातम्या
0
पुणेः खुनाच्या गुन्ह्यातील फरार शिवसेनेच्या माजी सरपंचास अटक

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. २२ मे २०२१

कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात मंगळवारी रात्री खुन झालेल्या मोहन चौंडकर या तरुणाचा मृतदेह सापडला होता. या खुनाच्या गुन्ह्यातील फरार झालेल्या दोन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये भोर तालुक्यातील पेंजळवाडी चा शिवसेनेचा माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकास रमेश चव्हाण (वय ३१.रा.गुजरवाडी, कात्रज) याच्यासह त्याचा मित्र सचिन जालिंदर डाकले (वय.२९, उत्कर्ष सोसायटी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांनी मांगडेवाडी भागातील युवक मोहन चौंडकर (वय.३२, रा.खलाटेनगर, मांगडेवाडी) याचा १८ मे रोजी खुन केला होता. मोहन चौंडकर हा विकास चव्हाण च्या मामीचा सख्खा भाऊ होता. या प्रकरणी मोहन चौंडकर यांच्या पत्नी पुजा हिने पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

कोण आहे, विकास चव्हाण…

भोर, वेल्हा, हवेली व कात्रज परिसरात विकास चव्हाणची युवा आणि स्टाईलिश सरपंच म्हणून ओळख होती. तसेच, तो सोशल मिडियावर ही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असायचा. कात्रज परिसरातील गुजरवाडी, मांगडेवाडी या परिसरात स्थानिक गाववाले व राजकीय पुढा-यांसोबत जमिनींचे गुंठेवारी करुन गुंठेवारीतील जमिनी विकण्याचा तो व्यवसाय करित होता. तसेच त्याचे कात्रज तलाव येथे हॅाटेल ही आहे. कात्रज परिसरातील अनेकांसमवेत त्याची ऊठबस असायची. भोर, वेल्हा व कात्रज भागातील राजकारणात ही तो सक्रिय होता. भोर तालुक्यातील विधानसभा लढविलेल्या एका शिवसेना नेत्याचा विशेष कार्यकर्ता म्हणून सगळीकडे विकासचा वावर होता. त्यामूळे विकास चव्हाण याने खुन केल्याचे व त्यास अटक झाल्याचे ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, आई वडिलांचे निधन झाल्याने विकास चव्हाण याचा संभाळ ज्या मामा मामीने केला होता, त्याच मामीच्या सख्या भावाचा त्याने खुन केला आहे. त्यामूळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय, विकास आणि त्याचा साथीदार सचिन यांच्या क्रुरतेची निंदा आणि निर्भर्त्सना केली जात आहे.

खुनाचे कारण व असा केला खुन…

विकास चव्हाण याने मोहन चौंडकर यास खलाटेनगर, मांगडेवाडी येथे एक गुंठा जमिन घेऊन दिली होती. त्याठिकाणी लाईट व इतर सुविधा देण्याचा शब्द विकास याने मोहन यास दिला होता. मात्र, त्याने त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. विकास याच्या मित्राने मोहन यांच्या शेजारीच जमीन खरेदी करुन बांधकाम सुरु केले होते. त्या सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी, १८ मे रोजी विकास चव्हाण व सचिन डाकले दारु पिण्यास बसले होते. त्यावेळी मोहन चौंडकर ही त्याठिकाणी नंतर आला. तोही त्यांच्यासमवेत दारु पिण्यास बसला. यावेळी मोहन याने लाईट व इतर सुविधा न दिल्याचा विषय या दोघांसमोर पुन्हा काढला. त्यावरुन त्यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी सुरु झाली. तेंव्हा, विकास व सचिन यांनी शिवीगाळ करुन मोहन यास बांधकामाच्या ठिकाणच्या विटा फेकून मारण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मयत मोहन खाली पडला. त्यानंतर विकास व सचिन या दोघांनी मयत मोहन याच्या चेह-यावर विटा मारुन मोहन याचा खून केला. त्यानंतर ते दोघे तेथून पळून गेले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यावर व गुन्हा दाखल झाल्यावर भारती विद्यापीठ पोलिस आणि गुन्हे शाखेची पथके या गुन्हेगारांचा शोध घेत होती. हे दोन्ही आरोपी सातारच्या दिशेने शिरवळ येथे निघून गेल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी शिरवळ फाटा येथे गेले. तिथे पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.

अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक निरीक्षक संदीप बुवा,पोलीस अंमलदार संजय भापकर, पोलीस कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अतुल साठे, प्रवीण रजपुत,मधुकर तुपसौंदर, फुलपगारे, हेमा ढेंबे, पो.ना.नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अश्विनी केकान, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, नितिन रावळ, अमर पवार, विवेक जाधव व पिराजी बेले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

कोरोना महामारीत सापडलेल्या सर्कस कलाकारांना दिला ‘हौसिंग सोसायटी’ने मदतीचा हात

Next Post

हे, असामान्य ज्ञान आपणास माहित आहे का ?

Next Post
हे, असामान्य ज्ञान आपणास माहित आहे का ?

हे, असामान्य ज्ञान आपणास माहित आहे का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राहुल गांधींचा खळबळजनक आरोप : “महाराष्ट्रात १ कोटी बनावट मतदार!”

राहुल गांधींचा खळबळजनक आरोप : “महाराष्ट्रात १ कोटी बनावट मतदार!”

August 8, 2025
अजित पवार म्हणाले, “ना आका, ना फाका! गुन्हेगारांना माफी नाही!”

अजित पवार म्हणाले, “ना आका, ना फाका! गुन्हेगारांना माफी नाही!”

August 8, 2025
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; सलमान खानसोबतच्या संबंधांमुळे निशाणा?

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; सलमान खानसोबतच्या संबंधांमुळे निशाणा?

August 8, 2025
धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाची तयारी?

धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाची तयारी?

August 8, 2025
रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल करून माफी मागायला सांगितली अन्…!

रोहित पवारांनी व्हिडिओ कॉल करून माफी मागायला सांगितली अन्…!

August 8, 2025
रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट!

रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट!

August 8, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.