DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सुनेत्रा अजित पवार सुमारे दोन लाख मतांनी विजयी होणार!

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या नावाचाच डंका!

DD News Marathi by DD News Marathi
May 4, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
सुनेत्रा अजित पवार सुमारे दोन लाख मतांनी विजयी होणार!

बारामती प्रतिनिधी :
दि. ०४ मे २०२४

बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी अतिशय रंगतदार लढत होते आहे. या लढतीकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. नणंद आणि भावजयीत होणारा हा सामना विशेषतः महिलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अप्रत्यक्षपणे ही लढत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही आहे. पण या मतदारसंघात फेरफटका मारला असता सुनेत्रा पवारांचे पारडे बरेच जड असल्याचे दिसून आले.

सुप्रिया सुळे या गेली १५ वर्षे या भागातून खासदार आहेत आणि सुनेत्रा पवारांची या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून एंट्री झाली आहे. खासदार असतानाही सुप्रिया सुळे यांनी बारामती किंवा परिसरातील इतर भागासाठी काही उल्लेखनीय किंवा भरीव काम केले नसल्याची नाराजी बहुतांश लोकांच्या मनात आहे. शरद पवारांची पुण्याई आणि अजित पवारांचा दमदार पाठिंबा या बळावरच त्या इतकी वर्षे खासदार होत राहिल्या असे लोक बोलतात. सुनेत्रा पवारांनी या निवडणुकीत एंट्री घेताच ही चर्चा आता जोर धरू लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.

सुनेत्रा पवारांनी बारामतीसाठी, हाती सत्ता नसतानाही बरीच विधायक कामे, विशेषतः महिलांसाठी केली आहेत. त्यामुळे महिलांची त्यांना प्रथम पसंती असल्याचे प्रकर्षाने जाणवले. इथल्या काही लोकांशी संवाद साधला असता असे समजले की, सामाजिक स्तर उंचावण्या सोबतच समाजाचे घटक असलेले विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या परिपूर्ण विकासासाठी प्रयत्न करून, त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे काम सुनेत्रा पवार यांनी केले आहे. उलटपक्षी हाती सत्ता असतानाही सुप्रिया सुळे यांची लोककल्याणाबाबत उदासीनता यावेळी त्यांना चांगलीच महागात पडणार आहे. त्यात आता अजित पवारांचीही साथ त्यांना नसल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) महायुतीत सामील झाला आहे. महायुतीची सर्वात भक्कम बाजू म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अफाट लोकप्रियता, लोकांच्या मनात कार्यसम्राट अशी प्रतिमा असलेल्या अजित पवारांची साथ आणि स्वतः सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांसाठी केलेली उल्लेखनीय आणि विधायक कामे याचा परिपाक म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत त्या सुमारे दोन लाखांच्या मताधिक्याने बाजी मारतील असा अंदाज आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#BaramatiLokasabha2024#SharadPawar#SunetraPawar#SupriyaSule
Previous Post

त्यांची ‘कोल्हेकुई’ थांबवणार!

Next Post

अजित पवारांचा जबरदस्त गुगली…

Next Post
अजित पवारांचा जबरदस्त गुगली…

अजित पवारांचा जबरदस्त गुगली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.