DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मतदान केंद्रासह सर्व महत्वाची माहिती ‘क्यूआर कोड’ द्वारे मिळवा!

बारामती लोकसभेसाठी उपक्रमाला सुरुवात. बाकी मतदारसंघही लवकरच समाविष्ट.

DD News Marathi by DD News Marathi
May 6, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
मतदान केंद्रासह सर्व महत्वाची माहिती ‘क्यूआर कोड’ द्वारे मिळवा!

पुणे प्रतिनिधी :

दि. ०६ मे २०२४

ह्या क्यूआर कोडची सुरुवात बारामती लोकसभा मतदार संघामध्ये होणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने क्युआर कोडच्या मतदार चिठ्ठ्यांचे वाटप जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये केले जाणार आहे.
राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. हा मतदारसंघ त्यामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील विशेष काळजी घेतली जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

उद्या मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे. आवश्यक ते साहित्य या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर पोहचविण्यात आले आहे. ईव्हीएम मशीनसह मतदानासाठी आवश्यक असलेले कर्मचारी तसेच त्यांना पुरवले जाणारे साहित्य याचे देखील वाटप जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी जे कर्मचारी नियुक्त केले आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम सध्या सुरू आहे.

वेगवेगळ्या उपाययोजना, मतदान करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान केंद्रापर्यंत यावे यासाठी केल्या जात आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये नव्याने आलेल्या नव मतदारांना तसेच शहरी भागात स्थलांतर झालेल्या मतदारांना आपले मतदान केंद्र नक्की कुठे आहे, हे समजण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा दिली जात आहे. असे क्यूआर कोड निवडणूक यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या मतदार चिठ्ठ्यांवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हा उपक्रम मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविला जात आहे. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये ह्या क्यूआर कोडची सुरुवात होणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने क्युआर कोडच्या मतदार चिठ्ठ्यांचे वाटप जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये केले जाणार आहे.

क्यूआर कोडसह वैयक्तिक माहितीच्या चिठ्ठ्या, मतदारांना चिठ्ठ्यांचे वितरण करताना दिल्या जात आहेत. यामुळे नवमतदार तसेच नव्याने स्थलांतरित झालेल्या मतदारांना आपले मतदान केंद्र नेमके कोठे आहे, ते हे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तातडीने समजणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार इपिक क्रमांक, वैयक्तिक तपशील अथवा मोबाइल क्रमांक यापैकी एक माहिती भरून एका क्लिकवर सर्व माहिती त्वरित समजणार आहे. जिल्हा प्रशासनातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BaramatiLokasabha2024#QRcode#VoterSlip#VoterSlipwithQRCode
Previous Post

अजित पवारांचा जबरदस्त गुगली…

Next Post

बारामतीनंतर अजित पवार आता शिरूरवर लक्ष ठेवून!

Next Post

बारामतीनंतर अजित पवार आता शिरूरवर लक्ष ठेवून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.