पुणे प्रतिनिधी :
दि. ०९ मे २०२४
“येत्या दोन वर्षांत विविध प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील” असं वक्तव्य शरद पवार यांनी नुकतंच केलं. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अनेक प्रकारचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का अश्या चर्चांना ऊत आला आहे. यावर अजित पवारांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, साहेबांनी (शरद पवार) काय भूमिका घ्यावी आणि काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे. या घडीला आमची भूमिका वेगळी आहे. ते त्यांच्या मनाला वाटतील त्याप्रमाणेच निर्णय घेत असतात. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी बरेच वेळा अशी विधानं केली जातात.
उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना जेवढा मी ओळखतो, त्याप्रमाणे ते असा काही निर्णय घेतील असे मला वाटत नाही. मी अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्री म्हणून पहिलं आहे. त्यावरून एकंदरीत ते असा काही निर्णय घेतील याची शक्यता वाटत नाही. महाविकास आघाडीमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना त्यांना जवळून पहिलं आहे. त्यांचा स्वभाव आणि कामाची पद्धत पाहाता त्यांनी पक्ष विलीन करण्याची शक्यता मला वाटत नाही.”