DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

फक्त कुटुंबातील व्यक्तींसाठी विरोधकांच्या इंजिनात जागा! 

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला.

DD News Marathi by DD News Marathi
May 10, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
फक्त कुटुंबातील व्यक्तींसाठी विरोधकांच्या इंजिनात जागा! 

पुणे प्रतिनिधी :
दि. १० मे २०२४

बाणेर, पर्वती भागात पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, गणेश बिडकर यांच्या सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मागील दहा वर्षात आपल्या देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. याच दहा वर्षांत चांदणी चौकातील पूल, रस्ते, मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आल्या. यात सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आल्या आहेत. पुणेकर नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे कारण यामुळे प्रदूषण कमी झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच केवळ हे सर्व शक्य झाले आहे. तसेच बदललेले पुणे आपल्याला २०१४ पासून बघायला मिळाले आहे. साहजिकच आगामी काळात आणखी नवनवीन प्रकल्प पुण्यात येतील ज्यांमुळे पुण्याचा कायापालट होईल. त्यासाठीच तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी १३ तारखेला मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी विकासपुरूष आहेत. वेगवेगळ्या १८ पक्षांची ‘महायुती’ त्यांच्या समवेत आहे. तर २४ पक्षांची खिचडी राहुल गांधी यांच्यासमवेत आहे. त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा कोणी उमेदवारच नाही. संगीत खुर्चीच्या खेळाप्रमाणे २४ नेते पाच वर्षांत, वर्षाला एक याप्रमाणे नेता निवडतील. ही निवडणूक १४० कोटी लोकांचा नेता निवडण्याची आहे. विरोधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ करीत आहेत. तर दुसर्‍या बाजूच्या विरोधकांच्या इंजिनात फक्त कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या इंजिनात मात्र सर्वसामान्यांसाठी जागा असल्याचं ते म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#MahavikasAghadi#Mahayuti#muralidharmohol#PuneLokasabha2024
Previous Post

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ११ वर्षांनंतर निकाल!

Next Post

शरद पवारांना पंतप्रधान मोदींची खोचक ऑफर!

Next Post
शरद पवारांना पंतप्रधान मोदींची खोचक ऑफर!

शरद पवारांना पंतप्रधान मोदींची खोचक ऑफर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.