DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची धडाकेबाज सुरुवात!

५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक आहे श्रीकांत!

DD News Marathi by DD News Marathi
May 11, 2024
in ताज्या बातम्या
0
राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची धडाकेबाज सुरुवात!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ मे २०२४

शुक्रवारी (१० मे रोजी) बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला बायोपिक ‘श्रीकांत’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहते ‘श्रीकांत’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट अखेर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा साधारण प्रतिसाद मिळाला.

नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक ३२ वर्षीय श्रीकांत बोल्ला यांचा ‘श्रीकांत’ हा बायोपिक आहे. तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा आणि राजकुमारच्या दमदार अभिनयाचं समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. तरी हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर लक्षणीय आकडेवारी दाखवू शकलेला नाही.

‘श्रीकांत’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, २.२५ कोटी रुपये कमावले आहेत. हे आकडे प्राथमिक आहेत, या आकडेवारीत अधिकृत डेटा आल्यानंतर थोडे बदल होऊ शकतात. ‘श्रीकांत’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी जवळपास ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका राजकुमार राव व्यतिरिक्त आहेत. पहिल्या दिवसाची कमाई फार चांगली नसली तरी वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते.

व्यावसायिक आणि बोलंट इंडस्ट्रीजचे मालक श्रीकांतयांचे गाव आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम शहराजवळ होते. अनेक किलोमीटर त्यांना शिक्षणासाठी चालत जावं लागायचं. ते हा प्रवास भाऊ आणि मित्रांच्या मदतीने करायचे. अंध असल्याने शाळेत फार कोणी त्यांच्याशी बोलायचं नाही. त्यांना एका अंध मुलांच्या शाळेत आठव्या वर्षी दाखल करण्यात आलं, जिथे ते क्रिकेट, पोहणं आणि बुद्धिबळ शिकले.

इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी, माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता, परंतु त्यांच्या अंधत्त्वाचे कारण देत आयआयटीने त्यांना प्रवेश नाकारला. या नकाराने खचून न जाता त्यांनी शिक्षण व्यवस्थेविरुद्ध खटला दाखल केला आणि सहा महिन्यांत खटला जिंकून त्यानंतर पुढील शिक्षण घेतलं. सायन्स मॅनेजमेंटचा अभ्यास मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये करणारे श्रीकांत बोल्ला हे पहिले नेत्रहीन विद्यार्थी आहेत. नंतर भारतात परतल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये १० कोटी रुपये खर्च करून बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली. इको फ्रेंडली वस्तू या कंपनीत बनतात आणि इथं दिव्यांग काम करतात. रतन टाटा यांनीही श्रीकांत बोल्ला यांच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. एबीपी लाइव्हच्या वृत्तानुसार त्यांच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू ५०० कोटी रुपये असल्याचे समजते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bollywood#RajkumarRao#Shrikant
Previous Post

शरद पवारांना पंतप्रधान मोदींची खोचक ऑफर!

Next Post

अमोल कोल्हे – आढळराव- पाटील यांच्यात अटीतटीचा सामना पुन्हा!

Next Post
अमोल कोल्हे – आढळराव- पाटील यांच्यात अटीतटीचा सामना पुन्हा!

अमोल कोल्हे – आढळराव- पाटील यांच्यात अटीतटीचा सामना पुन्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.