DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अमोल कोल्हे – आढळराव- पाटील यांच्यात अटीतटीचा सामना पुन्हा!

अजित पवारांचा 'प्रण' पूर्ण होणार?

DD News Marathi by DD News Marathi
May 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
अमोल कोल्हे – आढळराव- पाटील यांच्यात अटीतटीचा सामना पुन्हा!

पिंपरी प्रतिनिधी :

दि. ११ मे २०२४

भाजप प्रवेश आणि प्रारंभी निवडणूक लढविणे यांना नकार दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले विद्यमान खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवारांशी जुळवून घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. ग्रामीण भागातील शरद पवारांबाबत असलेली सहानुभूती लक्षात घेता, “महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती कोल्हेंना पाडणारच” हा शब्द खरा करण्यासाठी या निवडणुकीत अजित पवारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यांपैकी शरद पवार यांच्यासोबत राहाणे खासदार कोल्हे यांनी पसंत केले, तर शिरूरचे अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवारांची साथ द्यायला पसंती दिली. असे असतानाही अजित पवार यांनी शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेत स्वपक्षातील शिलेदारांऐवजी त्यांना उमेदवारी दिली. दांडग्या जंनसंपर्कासह, अनुभवी आढळराव यांनी डॉ. कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला. पाच वर्षांत कोल्हे मतदारसंघात फिरले नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तर संसदेतील शेतकऱ्यांसाठी, बैलगाडा शर्यतीसंदर्भात भाषणे आणि कामगिरी याचा दाखला देत समाजमाध्यमांवरून कोल्हे यांच्या बाजूने जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

शरद पवार यांच्याविषयी, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीणमधील खेड-आळंदी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर-हवेलीत सहानुभूतीचे वातावरण आहे. या भागांतील शेतकर्‍यांच्या नाराजीचा फायदा कोल्हे यांना होईल, असा अंदाज आहे. मात्र, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची साथ आढळराव यांना मिळेल. त्यामुळे दोघांनाही, या तिन्ही मतदारसंघांतून साथ मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याचा परिपाक म्हणून, शहरी मतदार आणि मागील वेळी आढळरावांना मताधिक्य दिलेले भोसरी, हडपसर विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिकेत असणार हे नक्की.

भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ शिरूरमध्ये निर्णायक आहेत. केवळ भोसरीतून ३७ हजार आणि हडपसरमधून साडेपाच हजार मतांची आघाडी मागील वेळी आढळरावांना मिळाली होती. डॉ. कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही भोसरी, हडपसरमधून मताधिक्य मिळू शकले नव्हते. आताची स्थिती अशी आहे की, भोसरी, हडपसरचे आजी-माजी आमदार महायुतीसोबत आहेत. भाजपने भोसरीतून एक लाखाचे मताधिक्य देण्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिरूरचा निकाल मुख्यतः भोसरी, हडपसरमधील मतदार कोणाच्या बाजूने झुकणार, यावर अवलंबून असणार आहे.

कोल्हे यांच्याबाबत ग्रामीण भागात नाराजी आहे. मतदारसंघात पाच वर्षे जनसंपर्क न ठेवल्याने आणि सहज उपलब्ध होत नसल्याने ही नाराजी निर्माण झाली आहे. असे असले तरी, शरद पवार यांच्याबाबत येथील जनतेला सहानुभूती आहे. त्यांना ग्रामीण भागातून पवार यांच्यामुळे मतदान होईल, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. पवारांबाबतची सहानुभूती आणि निष्ठेचा आधार महायुतीतील अनेक दिग्गजांच्या विरोधात जाईल आणि डॉ. कोल्हे यांना याचा फायदा होईल असे दिसत आहे. लोकसभेला, शिरूरमधून राष्ट्रवादीचे जास्त आमदार असतानाही, उमेदवार निवडून येत नसल्याचे मागील निवडणुकीपर्यंत दिसून आले होते. आमदारांच्या भूमिकेविषयीही त्यामुळे शंका घेतली जात होती. ज्या आढळरावांनी एके काळी विरोध आणि तीव्र संघर्ष केला त्यांना निवडून आणण्यासाठी आता मंत्री वळसे-पाटील, आमदार मोहिते, बेनके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

गेल्या निवडणुकीत, या मतदारसंघात जातीय समीकरणांचे गणित प्रभावी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. काही प्रमाणात मराठा आरक्षणामुळे जागी झालेली या समाजाची अस्मिता आढळरावांच्या पथ्यावर पडेल असे वाटत असले, तरी महायुतीला मराठेतर ओबीसींसह इतर समाजघटक गळण्याची धास्तीही आहे. दोन लाखांहून अधिक मतदार माळी समाजाचे आहेत, तर जुन्नर भागात आदिवासींची मतेही मोठ्या प्रमाणात आहेत, जी मते कोल्हे यांच्या पारड्यात जाऊ शकतील, असा महाविकास आघाडीचा अंदाज आहे.

मागील वेळी कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी निवडणुका आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच कोल्हे यांना या वेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असे म्हणत थेट आव्हान दिले. मी एखाद्याला पाडणार म्हटले की पाडतोच, असे त्यांनी छातीठोकपणे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर पुरंदरप्रमाणे शिरूरमध्येही शब्द खरा करून दाखविण्याचे आव्हान असणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdhalraoPatil#AjitPawar#AmolKolhe#NCP#SharadPawar
Previous Post

राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची धडाकेबाज सुरुवात!

Next Post

मोदींनी ठाकरे – पवारांना कुठलीही ऑफर दिलेली नाही!

Next Post
मोदींनी ठाकरे – पवारांना कुठलीही ऑफर दिलेली नाही!

मोदींनी ठाकरे - पवारांना कुठलीही ऑफर दिलेली नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.