DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘लाव रे तो व्हिडीओ’ मोहिमेला राज ठाकरेंची पुन्हा सुरुवात!

उद्धव ठाकरेंवर टीका करताना दाखवली सुषमा अंधारेंची क्लिप!

DD News Marathi by DD News Marathi
May 13, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
‘लाव रे तो व्हिडीओ’ मोहिमेला राज ठाकरेंची पुन्हा सुरुवात!

ठाणे प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२४

आज महायुतीचे ठाण्यातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकायावेळी त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज त्यांनी सभा घेतली. या सभेतच त्यांनी पुन्हा एकदा २०१९ प्रमाणे ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत व्हिडीओ लावला. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे तर सुषमा अंधारे यांची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. ही क्लिप दाखवत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “उद्धव ठाकरे यांच्या, “माझे वडील चोरले”, या वारंवार केल्या जाणार्‍या विधानाचाही समाचार राज ठाकरे यांनी घेतला.

“वडील चोरले हा निवडणुकीचा विषय असू शकतो का? फोडाफोडीचे राजकारण मला स्वतःला मान्य नाही. पण आमचा पक्ष फोडला म्हणून जे लोक आज बोलत आहेत, त्यांनी त्यांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांकडे एकदा पाहावे. याआधी त्यांनी काय उद्योग केलेत? हे आठवा. मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक याच उद्धव ठाकरेंनी खोके देऊन तोडले होते, तेव्हा तुम्हाला काही नाही वाटलं?” असं राज ठाकरे म्हणाले,

“फोडाफोडीच्या राजकारणाची महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी केली. त्यांनी पुलोदची स्थापना करून काँग्रेसला फोडले. त्यानंतर १९९१ साली शरद पवारांनी बाळासाहेबांची शिवसेना छगन भुजबळांना बाहेर काढून फोडली. तेव्हा शरद पवारांनी शिवसेनेचे आमदार फोडण्याचे काम केले. छगन भुजबळ आज या बाजूला आहेत. बाहेरून पाठिंबा दिला असल्यामुळे मी काहीही बोलू शकतो, असेही राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर नारायण राणे यांना घेऊन काँग्रेसने शिवसेना फोडल्याची आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

राज ठाकरे यांनी यानंतर, “लाव रे तो व्हिडीओ” असं म्हणत सुषमा अंधारे यांचा जुना व्हिडीओ दाखविला, ज्या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला होता. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर या व्हिडीओच्या अनुषंगाने टीका केली. जर तुमचे वडिलांवर प्रेम होते तर बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या सुषमा अंधारेंना पक्षात घेऊन प्रवक्ते पद का दिले?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

“ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या भुजबळांबरोबर तुम्ही २०१९ साली मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हा वडिलांना अटक करायला लावणाऱ्या व्यक्तीबरोबर मंत्रिमंडळात कसे बसलात?” असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ChhaganBhujbal#MaNaSe#RajThackeray#SushamaAndhare#ThaneLokasabha
Previous Post

मोदींनी ठाकरे – पवारांना कुठलीही ऑफर दिलेली नाही!

Next Post

“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…!”

Next Post
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…!”

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून...!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.