DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…!”

ठाणे लोकसभेविषयी देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

DD News Marathi by DD News Marathi
May 13, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…!”

ठाणे प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२४

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मूळ भाजपाचाच आहे. त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत त्या मतदारसंघावर दावा करत होतो. मात्र हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंना अखेर द्यावा लागला, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उद्या (दि. १३ मे) रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदाच्या निवडणुकीत तीन-तीन पक्ष असल्यामुळे जागावाटपाची चर्चा चांगलीच रखडली. विशेषतः महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने नाशिक, ठाणे आणि दक्षिण मुंबई हे मतदारसंघ आपल्याकडे राहावेत, यासाठी जोरदार प्रयत्न केले. ठाणे लोकसभेवर भाजपाने दावा सांगितला होता. पण हा मतदारसंघ अखेर त्यांना सोडावा लागला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आता खुलासा केला आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘मुंबई तक’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

एकनाथ शिंदे यांच्या दबावापुढे झुकल्यामुळे भाजपाला काही मतदारसंघ सोडावे लागले का? ठाण्याचा दावा विशेषतः सोडावा लागला का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस म्हणाले,”जागावाटपाची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांनुसार झाली होती. आम्ही हत्ती बाजूला करून फक्त शेपूट ठेवले होते. शेवटच्या टप्प्यातील जागांची चर्चा पुढे ढकलण्यात आली होती कारण विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू झाले होते. ९० टक्के पेपर आमचा सोडवून झाला होता. १० टक्के पेपर बाकी होता. पण हा उरलेला पेपर सोडवायला घेतल्यावर एकाच बैठकीत निर्णय घेतला. दुसरी बैठक त्यासाठी आम्हाला घ्यावी लागली नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

ठाणे लोकसभेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “ठाणे लोकसभा मतदारसंघ हा आमचाच होता. ठाणे लोकसभा रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथराव पाटील यांच्या काळापासून आमच्याकडे आहे. त्यामुळे साहजिकच आम्हाला हा मतदारसंघ हवाच होता. पण शिंदे गटाने समोर ठेवलेला तर्कही आम्हाला पटला. ठाणे मतदारसंघ बाळासाहेबांकडून स्व. आनंद दिघे यांनी मागून घेतला होता. आता राज्याचे मुख्यमंत्री दिघेंचेच सहकारी असताना त्यांच्याकडून ही जागा जाणे, हे मुख्यमंत्री शिंदेंसाठी अडचणीचे ठरले असते, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. आमचाही हेतू, आपल्या मित्रपक्षाला अपमानित करून एखादी जागा मिळवावी, असा नव्हता. त्यामुळे आम्ही ती जागा सोडली.”

आमचे चार आमदार ठाणे लोकसभेत आहेत. तीन महानगरपालिकांपैकी आमचे बहुमत दोन मनपात आहे. आमची मोठी ताकद ठाण्यात आहे. पण आमचे धोरण, मित्रपक्षाला अपमानित करून जागा घ्यायची नाही, हे होते, असेही फडणवीस म्हणाले.

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी खळबळजनक दावा केला होता. “माझ्यासमोर तुरुंग किंवा पक्ष बदलणे असे दोनच पर्याय असल्याने मी जड अंतःकरणाने पक्ष बदलला होता”, असे वायकर म्हणाले होते. वायकर यांच्या दाव्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “आम्हाला कुणालाही उमेदवार करण्यासाठी दबाव टाकावा लागेल अशी परिस्थिती नाही.” “रवींद्र वायकर असे का म्हणाले? याबाबत जाब विचारू” असेही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadanvis#EknathShinde#ThaneLokasabha
Previous Post

‘लाव रे तो व्हिडीओ’ मोहिमेला राज ठाकरेंची पुन्हा सुरुवात!

Next Post

बेपत्ता गुरुचरण सिंगच्या शोधात दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईत!

Next Post
बेपत्ता गुरुचरण सिंगच्या शोधात दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईत!

बेपत्ता गुरुचरण सिंगच्या शोधात दिल्ली पोलीस पोहोचले मुंबईत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.