DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

लग्नपत्रिका वाचून गोंधळले पाहुणे!

लग्नाला जायचं की नाही हा संभ्रम.

DD News Marathi by DD News Marathi
May 14, 2024
in Uncategorized
0
लग्नपत्रिका वाचून गोंधळले पाहुणे!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १४ मे २०२४

अनेकांचा लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न असतो. यात वेगळ्या मजकुराच्या लग्नपत्रिकाही उपयोगात आणल्या जातात. कधी लग्नपत्रिकाच तर कधी तिच्यातला मजकूर विचित्र असतो. सोशल मीडियावर अशा कितीतरी लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. अश्या यादीत आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. अशाच एका कार्डनं आतासुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहुण्यांसाठी एक महत्त्वाची सूचना या लग्नपत्रिकेच्या शेवटी देण्यात आली आहे.

प्रत्येकजण लग्न करतो, परंतु एकतर श्रीमंत किंवा सेलिब्रिटी आहेत अश्याच लोकांची लग्नं चर्चेत येतात. अश्यातच, त्यांचे लग्न प्रसिद्ध करण्यासाठी लोक काही ना काही हिकमती करू लागले आहेत. काही लोक लग्नात अमाप पैसा खर्च करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात, तर काहींना खास ठिकाणी लग्न करून जगाच्या नजरेत येण्याची इच्छा असते. अश्यातच, आजकाल चर्चेत येण्याचा आणखी एक मार्ग खूप प्रचलित झाला आहे आणि तो म्हणजे लग्नपत्रिका! लोक त्यांच्या लग्नाची पत्रिका अनोख्या पद्धती वापरुन, शक्कल लढवून छापत आहेत. अशीच एक लग्नपत्रिका आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

तुम्ही लग्नपत्रिकेत पाहिलं असेल पत्रिकेच्या शेवटी पाहुण्यांसाठी काही खास सूचना असतात. यात शक्यतो भांड्यांचा आहेर आणू नका, किंवा आहेरच आणू नका असं तर तुम्ही पाहिलंच असेल पण या लग्नपत्रिकेत मात्र काही वेगळंच लिहिलं आहे. या लग्नपत्रिकेत शेवटी, “कृपया दारू पिऊन येऊ नये” अशी सूचना लिहण्यात आली आहे. ही सूचना वाचून पाहुणे लग्नाला यायचं की नाही हे विचारत आहेत.

काहीजण ही लग्नपत्रिका पाहून आश्चर्यचकित झाले होते. या लग्नपत्रिकेची सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही खूप चर्चा होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sonamgupta2323 नावाच्या आयडीसह या अनोख्या लग्नाचे कार्ड शेअर करण्यात आले आहे, ज्याला आतापर्यंत तब्बल ४ लाख १२ हजार ३७२ हून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर बर्‍याच लोकांनी विविध मजेदार प्रतिक्रियाही या पत्रिकेवर, विशेषतः तिच्यामधील सचानेवर दिल्या आहेत. एका यूजरने लिहितो की ही “नेक्स्ट लेव्हल” आहे, तर कोणी “हे वाचून माझे मन गोंधळले” असे लिहिले आहे तर एकाने “आता आम्ही कोणत्याच लग्नाला जाययचं नाही का?” असा सवाल विचारला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #viralweddingcard#weddingcard
Previous Post

तृतीयपंथीयांकडून नागपुरात सर्वसामान्यांची लूट!

Next Post

“महाराष्ट्रासाठी विषाचा घोट देवेंद्र फडणवीसांनी पचवला, ते असेपर्यंत…”

Next Post
“महाराष्ट्रासाठी विषाचा घोट देवेंद्र फडणवीसांनी पचवला, ते असेपर्यंत…”

"महाराष्ट्रासाठी विषाचा घोट देवेंद्र फडणवीसांनी पचवला, ते असेपर्यंत..."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.