DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो आहे. मला अनेक मुस्लीम मित्र आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वरील विधान आलं चर्चेत

DD News Marathi by DD News Marathi
May 15, 2024
in ताज्या बातम्या, राजकीय
0
“मी मुस्लीम कुटुंबांत राहिलो आहे. मला अनेक मुस्लीम मित्र आहेत.”

वाराणसी प्रतिनिधी :
दि. १५ मे २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये पाहता त्यांना या निवडणुकीत मुस्लिम मते मिळणार नाहीत, असं वातावरण होतं. परंतु, आता त्यांनी यावर भाष्य केलं आहे. मुस्लिम कुटुंबात मी राहिलो असून त्यांच्याबरोबर जेवलोसुद्धा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाराणसी लोकसभा मतदारसंघातील गंगा नदीच्या काठावर ही मुलाखत झाली.

माझं शासन मॉडेल धर्म किंवा जातीच्या आधारावर आधारलेलं नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले की, “मी मुस्लिम कुटुंबात लहानपणी राहिलो आहे. मुस्लिम मित्र माझे अनेक आहेत. पण २००२ नंतर माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करण्यात आले”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले.

“मुस्लिम कुटुंबे आमच्या शेजारी राहत होती. माझ्या घरी ईदच्या दिवशी आम्ही जेवण बनवत नसू कारण शेजारच्या मुस्लिम घरातून जेवण यायचे. मोहरमच्या दिवशी आम्हाला ताजियाच्या खाली जायलादेखील शिकवले गेले”, असंही ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, २००२ नंतर त्यांची प्रतिमा डागाळल्यानंतर त्यांनी जमिनीवरील वास्तव जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. “मानेक चौक नावाची जागा अहमदाबादमध्ये आहे जिथे लोक संध्याकाळी जेवायला जातात. पण दिवसा सर्व व्यापारी मुस्लिम आणि सर्व खरेदीदार हिंदू आहेत. मी त्या मार्केटमध्ये काही लोकांना सर्वेक्षण करण्यासाठी पाठवले. माझ्याविरोधात त्यांच्यापैकी एकजण बोलला तेव्हा दुकानदाराने त्याला थांबवले आणि म्हणाले, “मोदींविरुद्ध एक शब्दही बोलू नका. मोदींमुळे माझी मुलं शाळेत जात आहेत. जवळपास ९० टक्के दुकानमालकांचे म्हणणे असेच होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या असल्या तरी ते या सर्वांची जाहिरात करत नाहीत. “माझा मंत्र ‘सबका साथ सबका विकास’ हा आहे. व्होट बँकेसाठी मी काम करत नाही. काही चुकीचे असल्यास मी ते चुकीचे आहे असे म्हणेन”, पंतप्रधान म्हणाले. “देशातील लोक मला मतदान करतील हा मला विश्वास आहे की . मी ज्या दिवशी हिंदू-मुस्लिम करायला लागेन, त्या दिवसापासून मी सार्वजनिक जीवनात राहण्यास योग्य राहणार नाही. हिंदू-मुस्लिम फूट मी पाडणार नाही, ही माझी बांधिलकी आहे”, असंही ते म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Muslim#NarendraModi#Varanasi
Previous Post

लोकसभा निवडणुकीत मोदी लाट न दिसण्याचे कारण काय?

Next Post

राहुल गांधींचे आव्हान भाजपाने स्वीकारले!

Next Post
राहुल गांधींचे आव्हान भाजपाने स्वीकारले!

राहुल गांधींचे आव्हान भाजपाने स्वीकारले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.