DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात!

मुंबई पोलिसांचा तपास सुरू.

DD News Marathi by DD News Marathi
May 15, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात!

घाटकोपर प्रतिनिधी :
दि. १५ मे २०२४

घाटकोपरमधील दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातो आहे. यातच आता, भावेश भिंडेच्या शेवटच्या लोकेशनबाबत माहिती पुढे आली आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे सांगण्यात आलं आहे.

पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध घेतला जातो आहे असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ ने दिले आहे. घाटकोपरमधील होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या मुलूंड येथील घरी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तो घरी आढळून आला नाही. यानंतर पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन शोधले. त्यांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात असल्याचे आढळून आले. या महितीनंतर पोलिसांचे एक पथक भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातही दाखल झाले. मात्र, तो सापडला नाही.

यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले, की भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन आम्हाला लोणावळ्यात आढळून आल्यापासुन त्याचा फोन बंद आहे. सात पथके त्याला पकडण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले होर्डिंग मुंबईत १३ मे रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कोसळले होते. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. ‘इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने हे होर्डिंग लावले होते. या कंपनीचा संचालक भावेश भिंडे हा आहे. त्याच्याविरोधात त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला असून ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) या दुर्घटनेनंतर एक निवेदन जारी करून हे जाहिरात फलक त्यांच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. BMC ने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून महापालिकेने यासाठी परवानगी दिलेली नव्हती. सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोठे असलेल्या या होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणूनही नोंद केली गेली होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #bhaveshbhinde#ghatkopar#ghatkoparmishap#hoardingmishap
Previous Post

भाजपाने ‘400 पार’ चा नारा का दिला?

Next Post

शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत?

Next Post
शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत?

शरद पवारांची 'राष्ट्रवादी', काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.