DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत?

सोनियाविरोधी भूमिकेचं काय होणार?

DD News Marathi by DD News Marathi
May 16, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत?

मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ मे २०२४

दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा नाशिकच्या सभेत केला. तसंच काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचं एक वक्तव्यहीचर्चेत आलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर येत्या दोन वर्षांत अनेक छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते की. शशी थरुर यांनी तर शरद पवारांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर रेड कार्पेट टाकून आम्ही तयार आहोत असं वक्तव्य केलं होतं. बस्स, शरद पवारांचं एक वक्तव्य आणि विलीनीकरण्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म १९९९ मध्ये सोनिया गांधींना विरोध दर्शवत झाला आहे आणि याचा उल्लेख अजित पवारांनीही त्यांच्या भाषणात केला होता.

महाविकास आघाडीचा महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रयोग हा शरद पवारांची पकड अजूनही राजकारणावर आहे, हे दाखवणारा ठरला होता. भाजपा आणि शिवसेनेत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरुन मतभेद झाल्यानंतर शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेस अशी अशक्य मोट बांधून दाखवली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. या सरकारचे मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरी सत्तेचा रिमोट मात्र शरद पवारांच्याच हाती होता. दुसरीकडे भाजपाने अडीच वर्षे वाट पाहून कोरोना काळ संपू दिला आणि त्यानंतर आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. शरद पवारांना हा एक प्रकारे धोबीपछाडच मिळाला. हा धोबीपछाड देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाही भाजपाने सरळ उपमुख्यमंत्री पद देत अपेक्षाभंग केला. असं सगळं असलं तरीही अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती की, फडणवीस हे शरद पवारांना पुरुन उरलेत . तसंच ज्या फोडाफोडीला नावं ठेवली जात आहेत आणि दूषणं दिली जात आहेत त्या फोडाफोडाची सुरुवात राज्यात करणारे शरद पवारच आहेत असं वक्तव्य नुकतंच राज ठाकरेंनीही केलं. शरद पवारांनी केलेल्या पुलोदच्या प्रयोगानंतर त्यांचं काँग्रेसबरोब जाणं आणि त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी केलेलं बंड तसंच त्यातून झालेला राष्ट्रवादीचा जन्म हे त्यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे आहेत.

१९९९ मध्ये १२ वी लोकसभा बरखास्त झाली आणि १३ व्या लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झाली. सोनिया गांधी या विदेशी असल्याचा मुद्दा त्यावेळी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये चर्चेत आला. हा मुद्दा काढणारे पी. ए. संगमा, तारीक अन्वर आणि शरद पवार हे तीन नेते होते. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा, पक्षात त्यावेळी चांगलं वजन असलेले तारिक अन्वर आणि शरद पवार यांनी सोनिया गांधी या ‘विदेशी’ असल्याचा मुद्दा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेस आणला. त्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत कलह बाहेर आला. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्यानंतर काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद सीताराम केसरींकडे आलं होतं. मात्र सोनिया गांधींना अध्यक्ष करण्यासाठी त्यांना पद सोडावं लागलं त्यामुळे त्या काळात तेदेखील नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

शरद पवारांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. हेच मुख्य कारण, १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध दर्शवण्याचं आणि त्या विदेशी वंशाच्या असल्याचा मुद्दा बाहेर काढण्याचं होतं. सोनिया गांधी १९९९ मध्ये राजकारणात नवख्या होत्या. शरद पवारांना त्यामुळेच त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदी बसावं असं मुळीच वाटत नव्हतं. सोनिया गांधींमध्ये तेवढी राजकीय क्षमता आणि परिपक्वता नसल्याचं तेव्हा शरद पवारांचं मत होतं. या सगळ्या विचारांतूनच शरद पवारांनी सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा बाहेर काढला. यामुळे पक्षात बंडाळी माजेल आणि आपल्याला पाठिंबा मिळेल असा त्यांचा अंदाज होता. मात्र शरद पवारांचं गणित चुकलं. काँग्रेसचे जुने जाणते नेते हे मॅडम सोनियांबरोबरच राहिले. शिवाय हे बंड फसल्याचा दुसरा परिणाम असा झाला की काँग्रेसने तारिक अन्वर, पी. ए. संगमा आणि शरद पवार या तिन्ही दिग्गजांची हकालपट्टी केली. मात्र शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत केलेली होती. त्यामुळे त्यांनी, गांधी-नेहरुंच्या विचारांवर चालणारे आम्ही आहोत असं म्हणून १० जून १९९९ या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवारांना अनपेक्षित असा करीश्मा त्यावेळी करुन दाखवला. मात्र लगेचच ऑक्टोबर १९९९ मध्येच शरद पवारांनी सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा बाजूला सारत पुन्हा काँग्रेसशी हातमिळवणी केली. अजित पवारांनीही त्याचा उल्लेख नुकताच त्यांच्या भाषणात केला होता.

“सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा १९९९ ला शरद पवारांनी काढला.जरी त्या राजीव गांधींच्या पत्नी असल्या तरीही विदेशी वंशाच्या आहेत. आपल्या देशात जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नाही असं कसं? संगमा, तारिक अन्वर आणि शरद पवारांनी निर्णय घेतल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आलं. मग राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. हे सगळं आपण पाहिलं. ऑक्टोबर १९९९ मध्ये सांगितलं काँग्रेस बरोबर जायचं होतं त्यामुळे सोनिया गांधींचा विदेशी असण्याचा मुद्दा शरद पवारांनीच सोडून दिला. तेव्हा आम्ही काही बोलू शकलो नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा होती.”

“नंतरच्या काळात, राजकारणात हे सगळं घडत असताना, २००४ मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते. मला विलासराव देशमुखांनी विचारलं की तुमचा मुख्यमंत्री कोण ? मला मॅडमनी (सोनिया गांधी) सांगितलं की आपला मुख्यमंत्रीपदावर दावा नाही. आपण उपमुख्यमंत्रीपद घेऊ. पण तेव्हाही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. त्या बदल्यात चार मंत्रिपदं वाढवून घेतली. तेव्हाही आम्ही आदेश ऐकला. आत्ता जे केलंय ते २००४ ला केलं असतं खूप बरं झालं असतं. आता काय करणार?” असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

सोनिया गांधींना विरोध दर्शवून शरद पवारांनी १० जून १९९९ ला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा बाजूला ठेवून शरद पवार काँग्रेसबरोबर गेले. आज पक्षाला २४ वर्षे पूर्ण झाली तेव्हा पक्ष फुटला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे उरलेला राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हाच औत्सुक्याचा विषय आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#congress#NCP#SharadPawar
Previous Post

होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात!

Next Post

नारकर जोडप्याचा आणखी एक जबरदस्त डान्स!

Next Post

नारकर जोडप्याचा आणखी एक जबरदस्त डान्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.