DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नारकर जोडप्याचा आणखी एक जबरदस्त डान्स!

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव!

DD News Marathi by DD News Marathi
May 16, 2024
in मनोरंजन
0

मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ मे २०२४

इन्स्टाग्राम रील्सची भुरळ अलीकडच्या काळात प्रत्येकाला पडताना दिसत आहे. विविध बॉलीवूड गाणी या रील्सवर नेहमीच व्हायरल होत असतात. सामान्य लोक असो की सेलिब्रिटी, सगळेच या व्हायरल गाण्यांवर थिरकत असतात. संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’नंतर आता आणखी एक गाणं सर्वत्र ट्रेडिंग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नारकर जोडप्याने या गाण्यावर नुकताच डान्स केला आहे.

सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी कायम चर्चेत असते. नारकर जोडप्याच्या रील्स व्हिडीओची सर्वाधिक चर्चा इन्स्टाग्रामवर रंगते. हे दोघेही ट्रेडिंग असणाऱ्या लोकप्रिय गाण्यांवर भन्नाट रील्स बनवतात. नारकरांनी शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

बॉलीवूडमध्ये १७ वर्षांपूर्वी ‘झुम बराबर झुम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा, लारा दत्ता आणि बॉबी देओल यांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका होत्या. याच चित्रपटाचं मुख्य शीर्षक गीत असलेल्या ‘झुम बराबर झुम’ गाण्यावर आता नारकर जोडप्याने डान्स केला आहे. या व्हिडीओला ऐश्वर्या यांनी ‘प्रत्येक क्षणाचा आनंद घेत नेहमी मनापासून डान्स करा’ असं कॅप्शन दिलं आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अरे मलाही तुमच्याबरोबर डान्स करायचा आहे”, “अविनाश सरांची एनर्जी खरंच जबरदस्त आहे”, “अविनाश सरांना पाहून कोणालाही डान्स करावासा वाटेल”, “किती एन्जॉय करता”, “तुम्ही दोघे खूपच सुंदर नाचता” ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अश्या असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत.

सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठी’ वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ‘रुपाली’ हे नकारात्मक पात्र साकारत आहेत तर अविनाश नारकरांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अविनाश यांच्यासह अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AishwaryaNarkar#AvinashNarkar#ZoomBarabarZoom
Previous Post

शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत?

Next Post

भाजपाला कश्यासाठी हव्यात चारशे पार जागा?

Next Post
भाजपाला कश्यासाठी हव्यात चारशे पार जागा?

भाजपाला कश्यासाठी हव्यात चारशे पार जागा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.