DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शरद पवारांसोबत पार्टनरशिपच्या आमिषाने फसवणूक!

पोलीस कॉन्स्टेबलची ९३ लाखांची फसवणूक.

DD News Marathi by DD News Marathi
July 29, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
शरद पवारांसोबत पार्टनरशिपच्या आमिषाने फसवणूक!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २९ जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावानं फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच मुंबईत घडला आहे. मुंबई पोलीस दलात हवालदार असलेल्या विजय गायकवाड यांना शरद पवारांच्या नावानं फसवण्यात आलं आहे. त्यांची तब्बल ९३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. शरद पवारांचा सहभाग असलेल्या दोन कंपन्यांसोबत भागिदारी करुन देतो, असे आमिष दाखवत व्यावसायिकानं ५७ वर्षीय विजय गायकवाड यांना भुरळ घातली.

गोरेगावात राहणाऱ्या ४८ वर्षीय अपूर्व जगदिश मेहता यांनी गायकवाड यांची फसवणूक केल्याचा हा प्रकार आहे. २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर गायकवाड तैनात आहेत. गायकवाड आणि मेहता यांची तेथे अनेकदा भेट व्हायची. यातूनच दोघांची ओळख झाली. २०२१ मध्ये शरद पवारांच्या आदेशावरुन आपण कंपनी सुरु  करत असल्याचं मेहतानं गायकवाड यांना सांगितलं आणि भागिदार होण्याचा प्रस्तावही दिला. मेहतानं गायकवाड यांना एका कंपनीला तुमच्या लेकीचं नाव देऊ आणि दुसरी कंपनी तुमच्या मुलाच्या नावानं सुरु करु, अशी ऑफर दिली.

शिवाय मेहतानं त्यांना सांगितलं की तुम्ही शरद पवारांचे व्यावसायिक भागीदार व्हाल. मात्र हा व्यवसाय सुरु करण्यासाठी १ कोटी रुपयांची गरज लागेल. मेहता यांच्या बतावणीला भुलून गायकवाड यांनी त्यांचा फ्लॅट विकला, एलआयसीकडून कर्ज घेतलं आणि प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढले. मुलांचं भवितव्य सुरक्षित होईल या भावनेनं गायकवाड यांनी मेहताला ९३ लाख रुपये दिले. पण तरीही व्यवसाय सुरु न झाल्याने गायकवाड यांना चिंता वाटू लागली.

व्यवसाय सुरु होत नसल्याबद्दल गायकवाड यांनी मेहताकडे विचारणा केली. त्यावर गायकवाडांना, तुमच्या लेकीच्या कुंडलीत राहू दोष आढळून आला असल्याने तुम्ही दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा करा, असा सल्ला मेहतानं दिला. गायकवाड यांनी चक्क त्यावरही विश्वास ठेवला आणि कुटुंबासह पूजाही केली. यानंतर गायकवाड यांना मेहतानं दिंडोशी कोर्टात बोलावलं. कंपनीची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं त्यांना सांगून काही कागदपत्रांवर गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

सरतेशेवटी मेहतानं शरद पवारांच्या नावानं आपली फसवणूक केल्याचं गायकवाड यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सहार पोलीस स्थानक गाठलं आणि मेहताविरोधात तक्रार दाखल केली. मेहताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्यापपर्यंत मेहताला अटक करण्यात आलेली नाही.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #cheating#policeconstable#SaharPoliceStation#SharadPawar
Previous Post

भाजप नेत्याने संतापून केला शिवसेनेत प्रवेश!

Next Post

दिल्लीत कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांचा पावसाच्या पाण्यात बुडून मृत्यू!

Next Post
दिल्लीत कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांचा पावसाच्या पाण्यात बुडून मृत्यू!

दिल्लीत कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांचा पावसाच्या पाण्यात बुडून मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.