DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सरकारी योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी २७० कोटींची तरतूद!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मेगा प्लॅन.

DD News Marathi by DD News Marathi
July 30, 2024
in Uncategorized
0
सरकारी योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी २७० कोटींची तरतूद!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ३० जुलै २०२४

महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध योजना व विकास प्रकल्प आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे २७० कोटी पाच लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाला या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी मान्यता देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागातर्फे घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या सरकारी योजनेसह महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अन्य योजना व विविध विकास प्रकल्प आणि राज्य सरकारच्या ध्येयधोरणांच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. सुमारे २७० कोटी पाच लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाला, या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी मान्यता देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागातर्फे घेण्यात आला आहे. विशेष प्रसिद्धी मोहिमेंतर्गत वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडिओ, बाह्य व अन्य माध्यमे, समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमे यांसह विविध नवमाध्यमांद्वारे सरकारी योजनांची प्रसिद्धी या निर्णयानुसार केली जाणार आहे.

शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला असून, या निर्णयानुसार राज्यात आणि राज्याबाहेरसुद्धा महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे. माध्यम आराखडादेखील यासाठी तयार करण्यात आला आहे. तीन कोटी रुपयांची तरतूद, सरकारी संदेशाची निर्मिती, संदर्भ, साहित्याची निर्मिती करणे, प्रिंट, दृकश्राव्य, ऑडिओ, जिंगल्स, लघुपट यांसाठी करण्यात आली आहे.

४० कोटी रुपयांची अंदाजित तरतूद राज्यातील आणि राज्याबाहेरील महत्त्वाच्या महानगरांमध्ये मुद्रित माध्यमांद्वारे प्रसिद्धीकरिता करण्यात आली आहे. हा निधी जुलै २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत वापरता येणार आहे.

याशिवाय ३९ कोटी ७० लाख रुपयांच्या अंदाजित रक्कमेला, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसिद्धीच्या माध्यमातून दूरदर्शन, आकाशवाणी वाहिन्या, खासगी एफएम रेडियो, स्थानिक केबल वाहिन्या, चित्रपटगृहे, रेल्वे स्थानकांवरून ऑडिओद्वारे प्रसिद्धी आणि सुपर मार्केटमध्ये ऑडिओद्वारे होणारी प्रसिद्धी या सर्व माध्यमातून होणाऱ्या प्रसिद्धीसाठी मान्यता देण्यात आली आहे. तर बाह्य माध्यमांद्वारे प्रसिद्धी अर्थात खासगी डिजिटल फ्लेक्स बॅनर, होर्डिंग आणि एसटी बस, विमानतळ, टॅक्सी, वॉल पेटिंग, रेल्वे रॅप आणि पॅनल व बॅक पॅनल यासाठी १६५ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

या योजनांची होणार प्रसिद्धी?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शासकीय दस्तावेजांमध्ये आईच्या नावाचा समावेश, शुभमंगल सामूहिक विवाह योजनेस वाढवलेले अनुदान, लखपती दीदी, मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजना, कृषी शेतकरीविमा, पायाभूत सुविधा, सागरी किनारा मार्ग, अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग, मराठी भाषा विद्यापीठ, दुग्ध योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, सिंचन, महाआवास योजना, रोजगार हमी योजना आणि ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सागरी सुरक्षा या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#DevendraFadanavis#EknathShinde#MaharashtraGovernment#MaharashtraGovernmentSchemes#Publicity
Previous Post

दिल्लीत कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांचा पावसाच्या पाण्यात बुडून मृत्यू!

Next Post

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात!

Next Post
उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात!

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

July 29, 2025
उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.