DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात!

पीडितेच्या वडिलांनी उघडली आरोपीची पाच वर्ष जुनी कुंडली.

DD News Marathi by DD News Marathi
July 30, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात!

रायगड प्रतिनिधी :
दि. ३० जुलै २०२४

नवी मुंबईतील यशश्री शिंदे खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. दाऊद शेख नावाच्या, पीडितेचा प्रियकर असलेल्या व्यक्तीवर ही हत्या केल्याचा आरोप आहे. श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणाची आठवण या प्रकरणामुळे लोकांना झाली आहे. शनिवारी नवी मुंबईतील उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली २२ वर्षीय तरुणी आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली. तिच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांना यशश्रीवर अनेक वेळा वार केल्याचे आढळून आले. दाऊद शेख हा या घटनेतील मुख्य आरोपी असून पोलिसांनी त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद शेख नावाच्या मुलाविरुद्ध मृत तरुणीच्या वडिलांनी २०१९ मध्ये एफआयआर दाखल केला होता. यात त्यांनी शेखवर यशश्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तरुणी अल्पवयीन असल्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचं असं म्हणणं आहे की, त्यावेळी कलम ३५४, ५०६, बाल संरक्षण कायदा २०१२च्या कलम ८ आणि १२ नुसार दाऊदवर गुन्हा दाखल केला होता,

यशश्री शिंदे २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटायला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती अशी माहिती मिळते आहे. तिच्या कुटुंबीयांनी ती घरी न परतल्याने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांच्या प्राथमिक अहवालात सार्‍यांना हादरवून टाकणारी माहिती समोर आली. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाला फाडून टाकल्याने मृताचा चेहरा विद्रूप झाला होता. यशश्री शिंदेचे कॉल रेकॉर्ड तपासल्यावर ती कर्नाटकातील दाऊद शेखच्या बऱ्याच दिवसांपासून संपर्कात असल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर पोलिसांना शिंदेच्या अंगावर ‘दाऊद’ नावाचा टॅटूही सापडला आहे.

यशश्री आणि दाऊद शेख हे २०१९ पासून रिलेशनशिपमध्ये होते असे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समजते आहे. मात्र, तरुणीचे पालक या गोष्टीवर नाराज होते. यानंतर शेख कर्नाटकातील त्याच्या मूळ गावी स्थलांतरित झाला. आता तपासात शेख नुकताच उरणला गेल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या भेटीमागील कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, लोकांना या प्रकरणाकडे जातीय दृष्टिकोनातून न पाहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांची तीन पथके या प्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आली आहेत. पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी मृतदेह छिन्नविछिन्न असल्याचा दावा फेटाळून लावला. उरण पनवेल महामार्गालगतच्या शेतात पोलिसांना यशश्रीचा मृतदेह, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. यशश्रीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेकदा वार करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून तिचे हात पायही तुटल्याचे समोर आले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DaudShaikh#Raigad#Uran#YashashriShinde
Previous Post

सरकारी योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी २७० कोटींची तरतूद!

Next Post

शरद पवारांचं आगीत तेल ओतण्याचं काम चालू आहे!

Next Post
शरद पवारांचं आगीत तेल ओतण्याचं काम चालू आहे!

शरद पवारांचं आगीत तेल ओतण्याचं काम चालू आहे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.