DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शरद पवारांचं आगीत तेल ओतण्याचं काम चालू आहे!

प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप.

DD News Marathi by DD News Marathi
July 30, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
शरद पवारांचं आगीत तेल ओतण्याचं काम चालू आहे!

लातूर प्रतिनिधी :
दि. ३० जुलै २०२४

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता शरद पवार आगीत तेल उतरण्यासाठी उतरले आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर टीका केली. लातूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली होती. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना शरद पवारांवर हा गंभीर आरोप केला.

गेल्या दीड वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्यासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला. सरकारने त्यानंतर त्यांना आरक्षण दिलं. मात्र त्यांना ते आरक्षण मान्य नाही. सगेसोयऱ्यांसह ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे अशी मनोज जरांगेंची आग्रही मागणी आहे. लक्ष्मण हाके यांनीही काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे का? शरद पवारांसह इतर दोन पक्षांची त्यावर भूमिका काय? असं विचारलं. शरद पवारांनी मात्र त्यावर थेट उत्तर दिलेलं नाही. हाच मुद्दा उपस्थित करत आता प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आगीत तेल ओतत असल्याचं म्हटलं आहे.

“आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी शरद पवार उतरले आहेत. आता नामांतराचा मुद्दा काढण्याचं कारणच काय? नामांतर होऊन इतकी वर्षे झाली आहेत. तो मुद्दा फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी काढला आहे का? शरद पवार यांना हा मुद्दा आत्ता उपस्थित करुन काय साध्य करायचं आहे? बऱ्याच वर्षांपूर्वीचा नामांतराचा मुद्दा होता. ठरवून त्या मुद्द्याला शरद पवार हवा देत आहेत. ते या माध्यमातून राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम करत आहेत.” असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांनाही सल्ला दिला आहे. मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवल्या पाहिजेत, त्यांनी हा पर्याय त्यांची मागणी मान्य झाली नाही तर स्वीकारला पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी, मराठ्यांना न्याय देण्यासाठी मनोज जरांगेंनी २८८ जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. राज्यातील गरीब मराठ्यांचे प्रश्न श्रीमंत मराठा समाज दाबून टाकतो आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मनोज जरांगेंनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा सल्ला लातूरमधून प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना दिला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #latur#manojjarange#marathareservation#prakashambedkar#SharadPawar
Previous Post

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात!

Next Post

राज ठाकरे म्हणाले, राज्यात आरक्षणाची गरज नाही!

Next Post
राज ठाकरे म्हणाले, राज्यात आरक्षणाची गरज नाही!

राज ठाकरे म्हणाले, राज्यात आरक्षणाची गरज नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.