DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजितदादांनी सांगितले लाडकी बहीण योजना आणण्याचे कारण!

आमच्या नावापुढची बटणं दाबावीत असे केले आवाहन.

DD News Marathi by DD News Marathi
August 9, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अजितदादांनी सांगितले लाडकी बहीण योजना आणण्याचे कारण!

नाशिक प्रतिनिधी :
दि. ०९ ऑगस्ट २०२४

आम्ही लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करण्यासाठी आणली, ती पुढे सुरू ठेवायची म्हणून चालू केली आणि ती बंद करायची नाहीये. यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवणं आवश्यक आहे, त्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबली पाहिजेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे विधान केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा नाशिकमधील निफाड येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितांना संबोधित करत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येऊ घातल्या असल्याने महायुतीतील प्रमुख घटक पक्षांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या आजच्या भाषणातून याचीच प्रचिती आली आहे. त्यांनी महिला मतदारांना, सरकारच्या योजनांचा लेखाजोखा मांडत साद घातली आहे.

अजित पवार म्हणाले, महिला आणि तरुणवर्गासाठी आम्ही सरकारच्या ज्या योजना आणल्या, त्यात राष्ट्रवादीचं योगदान मोठं आहे. अर्थमंत्री या नात्याने मी स्वत: या योजनांचा अभ्यास केला आहे. महिलांना मान सन्मान प्राप्त करुन देणं हे सरकारचं कर्तव्य आहे या भावनेनं ही योजना आम्ही आणली. आम्ही खर्चाचा अभ्यास केला, वायफळ खर्च कमी करुन काटकसर कशी करावी, यावर विचार केला. थेंबेथेंबे तळे साचे असं असल्याने त्याप्रकारे साडेतेरा कोटी जनतेचा संसार आम्ही करत आहोत. तुमचं सबलीकरण व्हावं असं वाटत असल्यास आम्हाला मतदान केलं पाहिजे, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे.

भगिनींना भाऊबीज दिल्याशिवाय महायुतीचं सरकार गप्पा बसणार नाही, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसै १७ तारखेला तुमच्या खात्यात जमा होतील, अशा शब्दांत अजित पवारांनी महिलांना खात्री दिली आहे.

वारंवार विरोधकांकडून, सत्ताधाऱ्यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर योजनांची घोषणा केली आहे, अशी टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही योजना आणायची म्हणून आणली नाहीये. ती बंद करायची म्हणूनही आणली नाही तर ती चालू ठेवायची म्हणून आणली.’ तसेच सरकारवर चुनावी जुमला म्हणून आरोप केले जातात. आम्ही योजना जरी आणल्या असल्या तरी आम्हाला औटघटकेचं राजकारण करायचंच नाही, आम्हाला दीर्घकाळाचं राजकारण करायचंय.’ असा पलटवार देखील पवारांनी केला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#ladkibahinyojana#Mahayuti#NCP
Previous Post

अपात्रतेनंतर विनेश फोगाटचा खळबळजनक निर्णय!

Next Post

हसीनांसारखं निवडणुकीत पळवून-पळवून मारायचं नाहीये!

Next Post
हसीनांसारखं निवडणुकीत पळवून-पळवून मारायचं नाहीये!

हसीनांसारखं निवडणुकीत पळवून-पळवून मारायचं नाहीये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

January 29, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.