DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दल RSS ने विचारला जाब!

राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच घेतला निर्णय-फडणवीस.

DD News Marathi by DD News Marathi
August 10, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दल RSS ने विचारला जाब!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १० ऑगस्ट २०२४

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं. फडणवीसांनी संघ परिवाराच्या समन्वय बैठकीत अजित पवारांना सोबत का घेतलं याची बाजू मांडली. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याचा तितकासा फायदा भाजपला झालेला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचं भाजपनं ठरवलंय असंही ते म्हटल्याचे समजते.

भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस अखेरच्या सत्रात, नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिवसभर चाललेल्या समन्वय बैठकीत सहभागी झाले. संघ परिवारातील 36 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर या बैठकीत भाजपच्या वतीने विस्तृतपणे भाजपची महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांनी ठेवल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. त्यांनी या बैठकीत, लोकसभा निवडणुकीसंदर्भात, गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले असा मुद्दाही मांडलाय. त्यामुळे आगामी काळात भाजप तिकीटवाटपात मोठ्या प्रमाणात फेरबदल करणार असे संकेतही फडणवीसांनी दिल्याचं मानलं जातंय. विरोधकांच्या नॅरेटीव्हला चोख प्रत्य़ुत्तर देण्यासाठी संघ परिवारानेही आता सक्रीयपणे मैदानात उतरण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

भाजप आणि शिवसेना 2019 मध्ये वेगवेगळे झाल्यानंतर कोणत्या परिस्थितीमुळे आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना सोबत घ्यावं लागलं याची राजकीय कारणमीमांसा फडणवीसांनी केली. फडणवीस म्हणाले, ज्यावेळेस 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं त्यावेळेस भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही एकट्या भाजपच्या मतांची टक्केवारी भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल अशी नव्हती म्हणून आधी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात आलं. यानंतरही भाजप आणि शिंदे यांच्या मतांची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नसल्याने अजित पवार यांना सोबत घेण्यात आलं. भाजपचे मत एकनाथ शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत 89% ट्रान्सफर झाले, तर शिंदेंचे वोटही 88% पर्यंत भाजपला ट्रान्सफर झाले आहे..

पुढे फडणवीस म्हणाले की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर सरकार म्हणून बरीच कामे करता आली आहेत. 2019 ते 22 दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना कामांमध्ये जो खंड पडला होता, ती कामे पुन्हा सुरू करता आली. महाराष्ट्र भाजपमधील सर्व प्रमुख नेत्यांनी बसून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थितीचे आकलन केले. मात्र त्यातही विधानसभा निवडणुकीत अजित दादा यांना सोबत घेऊनच महायुती म्हणून पुढे जाण्याचे ठरले, असेही फडणवीसांनी नमूद केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#DevendraFadnavis#EkanathShinde#RSS
Previous Post

हसीनांसारखं निवडणुकीत पळवून-पळवून मारायचं नाहीये!

Next Post

पाहा अमन सेहरावतचा ऑलिंपिकमधील विजयी क्षण!

Next Post

पाहा अमन सेहरावतचा ऑलिंपिकमधील विजयी क्षण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.