DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

रोहित पवारांची अजितदादांबद्दल पोस्ट व्हायरल!

म्हणाले, गुजरातच्या नेत्यांनी अजितदादांवर दबाव आणला.

DD News Marathi by DD News Marathi
August 14, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
रोहित पवारांची अजितदादांबद्दल पोस्ट व्हायरल!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ ऑगस्ट

लोकसभा निवडणुकीत माझी बहीण सुप्रिया सुळे हिच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीची होता, अशी कबुली नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मौन बाळगले असले तरी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये रोहित पवार यांनी अजितादादांवर, बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवण्यासाठी गुजरातमधील नेत्यांचा दबाव होता, असे म्हटले आहे.

रोहित पवार म्हणालेत, आम्हाला खात्री होती की, खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही. ती चूक होती असे तुम्हाला जाणवले म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करतात आणि हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही जरी चूक झाल्याचे म्हणत असाल तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आता विधानसभेला आपल्यावर असल्याची चर्चा आहे.

दबावाला बळी पडणे हा कुणाचा वैयक्तिक विषय असला तरी विचारधारा , स्वाभिमान आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामुळे एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करून महाराष्ट्र नासवणाऱ्या ‘त्या’ कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेन, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे.

अजित पवार यांनी अशी कबुली दिली होती की, राजकारण हे अगदी घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मात्र माझ्याकडून मागे थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात त्या काळामध्ये सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं, पार्लमेंटरी बोर्डाकडून तो निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करु शकत नाही. पण तसं व्हायला नको होतं असं आज माझं मन मला सांगतं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#NCP#RohitPawar#SunetraPawar#SupriyaSule
Previous Post

लाडकी बहीणचे पैसे काढून घेण्याचं वक्तव्य चेष्टेतही करु नका!

Next Post

महाराष्ट्र शासनाचा सन २०२४ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ रामायणाचार्य तथा ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांना जाहीर!

Next Post
महाराष्ट्र शासनाचा सन २०२४ चा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ रामायणाचार्य तथा ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांना जाहीर!

महाराष्ट्र शासनाचा सन २०२४ चा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' रामायणाचार्य तथा ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.श्री. संजय महाराज पाचपोर यांना जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

July 26, 2025
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

July 26, 2025
काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

July 25, 2025
हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

July 25, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

July 25, 2025
नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

July 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.