डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २० ऑगस्ट २०२४
पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरण्याविरोधात भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने केलेले अपील फेटाळण्याचे कारण देताना क्रीडा लवाद न्यायालयाने (सीएएस) खेळाडूंना त्यांच्या वजनमर्यादेपेक्षा कमी राहण्याची खात्री करावी लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत अपवाद देता येणार नाही, असा निकाल दिला आहे.
सीएएसच्या तदर्थ विभागाने १४ ऑगस्ट रोजी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याच्या कारणास्तव अंतिम फेरीतून अपात्र ठरविण्याविरोधात तिचे अपील फेटाळले होते, या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
“अॅथलीटसाठी समस्या ही आहे की वजन मर्यादेबाबत नियम स्पष्ट आहेत आणि सर्व सहभागींसाठी समान आहेत. कुणालाही सूट दिली जात नाही – ही एक वरची मर्यादा आहे. हे सिंगलटच्या वजनास देखील परवानगी देत नाही. त्या मर्यादेपेक्षा कमी राहतील याची खातरजमा करणे हे खेळाडूंवर अवलंबून आहे,’ असे सीएएसने म्हटले आहे.
अर्जदार वजनमर्यादेपेक्षा जास्त होता यात वाद नाही. तिने वरील पुरावे स्पष्टपणे आणि थेट सुनावणीत दिले असे CAS ने म्हटले आहे.
तिचे म्हणणे असे आहे की “जास्तीचे वजन 100 ग्रॅम होते आणि सहिष्णुतापूर्वक विचार झाला पाहिजे कारण ही एक छोटी अतिरिक्तता आहे आणि पिण्याचे पाणी आणि पाणी टिकून राहाणे यासारख्या कारणांसाठी, विशेषत: मासिक पाळीपूर्वीच्या टप्प्यात असे होऊ शकते.”
तीन वेळा स्थगिती दिल्यानंतर तिच्या अपिलावर आता हा निर्णय देण्यात आला आहे.
सेमीफायनलमध्ये तिच्याविरुद्ध पराभूत झालेल्या क्युबाच्या कुस्तीपटू युस्नेलिस गुझमान लोपेझसोबत तिला संयुक्त रौप्यपदक देण्यात यावे, अशी मागणी विनेशने आपल्या याचिकेत केली होती. अमेरिकेच्या सारा अॅन हिल्डेब्रँटने सुवर्णपदक पटकावले.