DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

उद्याचा बंद मागे घेण्याचं शरद पवार यांचं आवाहन!

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर केले आवाहन.

DD News Marathi by DD News Marathi
August 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
उद्याचा बंद मागे घेण्याचं शरद पवार यांचं आवाहन!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ ऑगस्ट २०२४

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. शरद पवारांनी या ट्विटमधून महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण त्यांच्या आवहनानंतर मुंबई हायकोर्टात या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. तातडीने आज या प्रकरणी सुनावणीदेखील झाली. हा बंद बेकायदेशीर ठरवत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला तसं झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. शरद पवारांनी या ट्विटमधून महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद कदाचित मागे घेतला जाण्याची शक्यता आहे असे दिसते.

“उद्या २४ ऑगस्ट २०२४ रोजी बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी याबाबतीत समाजातील सर्व स्तरांतून तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न याद्वारे झाला. भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत हा बंद होता. तथापि सदर बंद मुंबई उच्च न्यायालय यांनी घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. वेळेच्या मर्यादेमुळे सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे शक्य नाही. संविधानाचा आदर राखून आणि भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून महाराष्ट्र बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यास सुरूवात झाली आहे. उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या एक दिवस आगोदर काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांना पोलिसांकडून नोटीस जारी झाली आहे. याप्रमाणे स्थानिक पोलीस ठाण्याकडून मुंबईत अनेक नेत्यांना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नोटीस जारी झाल्याची माहिती मिळत आहे.

“सर्वांना सांगतो उद्या दुपारी २ वाजेपर्यंत बंद कडकडीत पाळून सरकारच्या कारभारावर आपण चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवून द्या. काही वर्तमानपत्रांत बातम्या आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापिकेने प्रश्न उपस्थित केला आहे की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील. काल बदलापूर प्रकरणावर कोर्टानेही ताशेरे ओढले आहेत. अश्या घटना रोज घडत आहेत. १३ ऑगस्टला बदलापूर,. १५ ला पुणे, २० ऑगस्टला लातूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये या घटना घडल्या आहेत. या घटना सरकारला आरसा दाखवत आहेत. एवढं सर्व चालू असताना एवढं निर्ढावलेपणे हे वागत आहेत. बहिणीची किंमत पैशात करून बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. बहिणीचं रक्षण करा. बहिणीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे. या सर्व बातम्या वाचून संतापाचा उद्रेक होतोय”, अशी भावना आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत व्यक्त केली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #maharashtrabandh#maharashtrastrike#mva#SharadPawar
Previous Post

24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद!

Next Post

टायगर जिंदा है आणि पीकेच्या आजीवन कमाईला मागे टाकत श्रद्धा कपूरचा स्त्री 2 हा आतापर्यंतचा 9वा सर्वात मोठा हिंदी चित्रपट बनला.

Next Post
टायगर जिंदा है आणि पीकेच्या आजीवन कमाईला मागे टाकत श्रद्धा कपूरचा स्त्री 2 हा आतापर्यंतचा 9वा सर्वात मोठा हिंदी चित्रपट बनला.

टायगर जिंदा है आणि पीकेच्या आजीवन कमाईला मागे टाकत श्रद्धा कपूरचा स्त्री 2 हा आतापर्यंतचा 9वा सर्वात मोठा हिंदी चित्रपट बनला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.