DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यात विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये फेरबदल? कसब्यातून कोण?

कँटोन्मेंट मध्ये असेल नवा चेहरा तर शिवाजीनगरमध्ये यांच्याशी संपर्क?

DD News Marathi by DD News Marathi
August 28, 2024
in ताज्या बातम्या, राजकीय
0
पुण्यात विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये फेरबदल? कसब्यातून कोण?

पुणे प्रतिनिधी :
दि. २८ ऑगस्ट २०२४

पुणे शहरात काँग्रेसकडून लढवण्यात येणाऱ्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठे फेरबदल करण्याचा प्रयत्न असून , त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहरात काँग्रेसकडून लढवण्यात येणाऱ्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठे फेरबदल होण्याचे संकेत असून, त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. कसब्यातून रोहित टिळक यांना विचारणा झाली असली, तरी या ठिकाणाहून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचीच वर्णी लागेल, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला तीन विधानसभा मतदारसंघ येतील. भारतीय जनता पक्षाला कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसकडून टक्कर दिली जाईल. कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंट मतदारसंघांत २०१९च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून गेले. गेल्या वर्षी कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून धंगेकर विजयी झाले होते. या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसकडून पारंपरिक उमेदवारांना सोडून नव्या उमेदवारांना संधी देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

मात्र ‘कसब्या’चे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनाच यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव आणि त्यातही ‘कसब्या’त त्यांना बसलेला फटका या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ब्राह्मण चेहरा देण्याविषयी चर्चा झडली आहे. त्यामध्ये रोहित टिळक यांच्या नावाचा विचार करण्यात आल्याचे समजते. २००९मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत टिळक यांनी माजी मंत्री गिरीश बापट यांना चांगली टक्कर दिली होती. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’कडून त्या निवडणुकीत धंगेकर रिंगणात होते. त्यावेळेस ‘धंगेकरांना मिळालेल्या बहुतांश मतांचा फटका टिळक यांना बसला होता. काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने, पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला काँग्रेसकडून संधी द्यायची असेल, तर कसब्याचा विचार व्हावा,’ अशी भूमिका व्यक्त केली आहे. असे असले, तरी टिळक मात्र काँग्रेसकडून लढण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘कसब्या’तून धंगेकर यांनाच उमेदवारी मिळण्याची

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे यांनी नुकताच काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साळवे पुणे कँटोन्मेंटमधून उमेदवार ठरण्याची दाट शक्यता आहे. गेल्या तीन निवडणुका पुणे कँटोन्मेंटमधून लढवणारे माजी मंत्री रमेश बागवे यांचा पत्ता कापला जाणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. बागवे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. चव्हाण यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतरही ते काँग्रेसबरोबरच एकनिष्ठ राहिले. त्यामुळे कँटोन्मेंटमधून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, गत दोन निवडणुकांमध्ये बागवे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता आणि तो साळवे यांच्या रूपाने पूर्ण झाल्याचे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे.

पाच वर्षांपूर्वी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले सनी निम्हण यांनी भाजपचा रस्ता धरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून निम्हण यांच्याकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तयारी करण्यात येत आहे. गत वेळी निवडणूक लढवलेले दत्ता बहिरट यांनी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा अत्यंत कमी मतांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी पराभव केला होता. या वेळी भाजपकडून शिरोळे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता दिसत असल्याचे समजते, त्यामुळे काँग्रेसकडून निम्हण यांच्याबाबत विचार सुरू आहे. निम्हण यांच्याकडून याबाबत खुलासा झालेला नसला, तरी त्यांच्याशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधल्याची चर्चा आहे. सनी निम्हण यांचे वडील माजी आमदार विनायक निम्हण काँग्रेसमध्ये असताना आमदार म्हणून निवडून आले होते. सनी निम्हण यांची त्यामुळे घरवापसी होणार, अशीही चर्चा रंगली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #indiannationalcongress#kasbavidhansabha#punevidhansabha#sunnynimhan
Previous Post

बंगाल बंदविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

Next Post

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण!

Next Post
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण!

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.