DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे!”

राजकोट किल्ल्यावरील राडा - संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा! मुंबई प्रतिनिधी :

DD News Marathi by DD News Marathi
August 29, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
“गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे!”

दि. २९ ऑगस्ट २०२४

दोन दिवसांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या घटनेनंतर काल राजकोट किल्ल्याला भेट दिली. भाजपाचे नारायण राणे आणि नितेश राणे हेदेखील यावेळी राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. जवळपास दोन अडीच तास चाललेल्या या राड्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी लक्ष्य केलं आहे.
आज मुंबईत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मालवण येथील घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावेळी बोलताना त्यांनी सडकून टीका केली. भाजपाच्या गुडांनी काल मालवण येथे पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून ही परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरले, त्यांना लाज वाटली पाहिजे, असे ते म्हटलं.

“मालवणमध्ये काल जे काही घडलं, हा महाराष्ट्राच्या गृह खात्यावर थुंकल्यासारखा प्रकार आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षणही देऊ शकले नाहीत, काल खुलेआम पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला, फक्त पोलिसांना हल्ला करायचा बाकी होता, हे सगळं सुरू असताना गृहमंत्री काय करत होते? तर या सगळ्याचं समर्थन करत होते”, असं संजय राऊत म्हणाले.

“फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार उध्वस्त झाले आहेत. राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीचे गोडवे गाऊन भाजपाच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार केला आहे तेवढा कोणीही केलेला नाही. यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये केला आहे. निवडणुकीत, राजकारणात याच पैशांचा वापर झाला आहे. भाजपाने आय.एन.एस. विक्रांत वाचवण्याच्या व्यवहारात सुद्धा पैसे खाल्ले, विशेष म्हणजे गृहमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिली फाईलवर जी सही केली, ती हे प्रकरण बंद करण्यासंदर्भात होती”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

“अधम आणि नीच प्रकारचं कृत्य शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात भाजपाने केलेलं आहे . शिवाजी महाराजांनी अश्या लोकांचा कडेलोट केला असता. जोडे मारा आंदोलन त्यामुळे आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेही या आंदोलनात उपस्थित राहतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#rajkot#SanjayRaut#shivajimaharaj
Previous Post

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण!

Next Post

कल्कीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी बॉडी-डबल सुनील कुमारसोबत विनोदी क्षण घालवले!

Next Post
कल्कीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी बॉडी-डबल सुनील कुमारसोबत विनोदी क्षण घालवले!

कल्कीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी बॉडी-डबल सुनील कुमारसोबत विनोदी क्षण घालवले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.