पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. २३ मे २०२१
आपल्यासाठी दिवस-रात्र काम करणारे पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव यांना शास्त्रीनगर येरवडा पोलीस स्टेशन येथे N95 मास्क व डेटॉल निर्जंतुकीकरण स्प्रे आदीचे वाटप युवक काँग्रेस पुणे शहरचे चिटणीस अभिजीत साळवे यांनी केले.
कोरोनाच्या संकटकाळात ते सतत समाजसेवेचा ध्यास घेऊन कार्यररत आहेत. साळवे यांचे सामाजिक कार्य निरंतरपणे सुरुच आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनुस शेख, माजी नगरसेवक राजेंद्र नाना शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ गलांडे, युवक काँग्रेसचे कार्यकरी अध्यक्ष राहुल भैय्या शिरसाट, रमेश दादा सकट व अभिजीत भाऊ साळवे मित्रपरिवार उपस्थित होते.
अभिजीत साळवे हे सतत नवनविन उपक्रम राबवून सामाजिक कार्य करित असतात. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतूक केले. तसेच अभिजीत साळवे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, कोरोना योद्ध्यांनी ही साळवे यांचे आभार व्यक्त केले.