नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २३ सप्टेंबर २०२४
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी दिल्ली वक्फ बोर्ड मनी लाँडरिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. यासोबतच न्यायालयाने अमानतुल्ला खान यांची एक मागणी मान्य केली, तर अन्य दोन मागण्यांबाबत तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवला. ईडीने अमानतुल्ला खान यांना २ सप्टेंबर रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली होती.
‘दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या नियुक्तींमधील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांचा सामना AAP आमदारावर आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर अमानतुल्लाला खान यांना आज पुन्हा राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यावर न्यायालयाने आप आमदाराच्या न्यायालयीन कोठडीत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. यावेळी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत वैद्यकीय नोंदी ठेवण्यास परवानगी दिली.कारागृहात इलेक्ट्रिक किटली आणि ग्लुकोज मीटर ठेवण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जावर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. या अर्जावर 25 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
याआधी ९ सप्टेंबर रोजी राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राकेश सियाल यांनी अमानतुल्ला खानच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करून २३ सप्टेंबरपर्यंत तुरुंगात रवानगी केली होती.