DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राज ठाकरे थेट गॅलेक्सी अपार्टमेंटवर सलमान खानच्या भेटीसाठी!

काय असावे कारण?

DD News Marathi by DD News Marathi
September 24, 2024
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
राज ठाकरे थेट गॅलेक्सी अपार्टमेंटवर सलमान खानच्या भेटीसाठी!

Salman Khan meets Raj Thackeray to discuss on Mumbai City on 28th March 2015 shown to user

मुंबई प्रतिनिधी:
दि. २४ सप्टेंबर २०२४

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘येक नंबर’ हा सिनेमा येतो आहे. या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला असून या टीझरला असंख्य प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. राज ठाकरे यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

‘येक नंबर’ या चित्रपटाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. लवकरच मुंबईत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा पार पडणार आहे. बॉलिवूडमधील दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता तर खुद्द राज ठाकरे यांनी या सोहळ्याचं आमंत्रण बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला दिल्याचं म्हटलं जात आहे.

नुकतीच सलमान खानची राज ठाकरे यांनी त्याच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंट इथं भेट घेतली. त्यांनी सलमानला येक नंबर चित्रपटाच्या ट्रेलर सोहळ्याचं आमंत्रण या भेटीत दिल्याचं म्हटलं जातंय. दोन महिन्यांपूर्वीही सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतरही त्याच्या घरी जाऊन राज ठाकरे यांनी त्याची भेट घेतली होती.

मध्यंतरीच्या काळात, या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी समोर आला होता.सुरुवातीलाच दिसते ती प्रचंड जनसमुदायानं भरलेली सभा… झलक महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची … जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा खणखणीत आवाज… उत्साह, जल्लोष… दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दिसतात दंगल, मारामारी, जाळपोळ आणि धुडगूस! यामध्येच ‘ठाकरे साहेब’ असा हलकासा आवाजही कानावर येतो. राज ठाकरेंचा आवाज या टीझरमध्ये असल्याचं म्हटलं जातंय.

झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात आता बरेच कुतूहल निर्माण झाले आहे, तसेच असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत आणि येत्या १० ऑक्टोबरला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MaNaSe#MarathiMovieYeknumber#RajThackeray#SalmanKhan
Previous Post

बदलापूर आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटरमध्ये मारला गेला. 

Next Post

गौतम गंभीरनंतर आता विराट कोहलीचा बीजेपीमध्ये प्रवेश होणार!

Next Post
गौतम गंभीरनंतर आता विराट कोहलीचा बीजेपीमध्ये प्रवेश होणार!

गौतम गंभीरनंतर आता विराट कोहलीचा बीजेपीमध्ये प्रवेश होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.