DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मॅट्रिमॉनियल वेबसाइटवरून IIM बँगलोरच्या पदवीधराने केली १६ तरुणींची फसवणूक!

‘असा’ झाला भांडाफोड.

DD News Marathi by DD News Marathi
September 25, 2024
in ताज्या बातम्या
0
मॅट्रिमॉनियल वेबसाइटवरून IIM बँगलोरच्या पदवीधराने केली १६ तरुणींची फसवणूक!

Beautiful Photo of handshake of a newly married Couple In India, promising each other love and affection for the rest of their life.

ग्रेटर नोएडा प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर २०२४

महिलांची फसवणूक मॅट्रिमोनिअल साइट्सवरून संपर्क साधून करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. भरीत भर म्हणून अशा प्रकारच्या साइट्सवरून आर्थिक फसवणूक झाल्याचे अनेक प्रकारही पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये आता असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने तब्बल १६ तरुणींची फसवणूक मेट्रिमोनियल साईटवरून केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर फसवणूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांद्वारे झालेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मॅट्रिमोनिअल साइट्सवरून ओळख करत १६ महिलांची फसवणूक, आयआयएम बेंगळुरूमधून शिक्षण घेतलेल्या एका पदवीधर तरुणाने केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. या ३९ वर्षीय व्यक्तीने २०२१ मध्ये आपली नोकरी गमावलेली होती. ग्रेटर नोएडामधील बिसरख येथील राधा स्काय गार्डन सोसायटीमध्ये हा व्यक्ती वास्तव्यास होता. या व्यक्तीचं नाव राहुल चतुर्वेदी असं आहे. मॅट्रिमोनिअल साइट्सवर या राहुल चतुर्वेदीने बनावट प्रोफाईल तयार केलं होतं. हे बनावट प्रोफाईल तयार करून १६ पेक्षा जास्त महिलांची ८ लाख रुपयांची फसवणूक त्यानं केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या प्रकरणासंदर्भात माहिती देताना सेंट्रल नोएडाचे डीसीपी शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितलं की, “आयआयएम बेंगळुरू येथे चतुर्वेदी याने शिक्षण घेतलेलं आहे. त्याने मध्य प्रदेशातील एका खासगी विद्यापीठातून त्याआधी बीकॉम पूर्ण केलं. २०१२ ते २०१७ पर्यंत चतुर्वेदीने एचआर मॅनेजर म्हणून गुडगावमधील टेलिकॉम कंपनीत काम केलं. त्यानंतर दुसऱ्या एका एमएनसी कंपनीबरोबर २०१८ ते २०२१ पर्यंत त्याने बेंगळुरूमध्ये काम केलं. नोएडा येथे २०२२ मध्ये तो आला आणि एका भागिदाराबरोबर त्याने कापड व्यवसाय सुरु केला. ग्रेटर नोएडातील एका ४० वर्षीय महिलेने याच काळात ७ सप्टेंबर रोजी बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.”

फिर्यादीने म्हटलं, “एका मॅट्रिमोनिअल साइटवरून मी आरोपीला भेटले. त्यानंतर आमचं संभाषण सुरु झालं. त्यानंतर तो माझ्या घरी येऊन पालकांनाही भेटला. तेव्हा आपल्या आजारी वडिलांच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे, असे सांगून त्याने वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे माझी तब्बल २.४ लाखांची फसवणूक केली. त्यानंतर जेव्हा मी माझे पैसे परत मागितले त्यावेळी आरोपीने टाळाटाळ केली. त्यानंतर आरोपीने माझ्याशी संपर्क बंद केला आणि धमकी दिली.”

दरम्यान तपासात, राहुल चतुर्वेदीने मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर बनावट प्रोफाईल तयार करून प्रीमियम मेंबरशिप घेतल्याचे उघड झालं आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम करत असल्याचं भासवून संशय टाळण्यासाठी तो फोन कॉल दरम्यान स्वतःचा आवाज मॉड्युलेट करायचा. एवढंच नाही तर त्याने पगाराच्या बनावट स्लिप्स देखील विश्वास बसण्यासाठी बनवल्या होत्या. आता पोलीस ठाण्यात चतुर्वेदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CentralNoeda#FraudinGreaterNoida
Previous Post

हे फेक एन्काऊंटर असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन! वरचेवर असं व्हायला पाहिजे!

Next Post

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!

Next Post
मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

July 26, 2025
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

July 26, 2025
काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

July 25, 2025
हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

July 25, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

July 25, 2025
नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

July 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.