DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपूर्ण स्वदेशी निर्मितीच्या महासंगणकाचं उद्घाटन!

काय आहे परम रुद्र सुपरकम्प्युटर?

DD News Marathi by DD News Marathi
September 27, 2024
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपूर्ण स्वदेशी निर्मितीच्या महासंगणकाचं उद्घाटन!

पुणे प्रतिनिधी :
दि. २७ सप्टेंबर २०२४

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ परम रुद्र सुपरकम्प्युटर लाँच केले. संपूर्ण स्वदेशी निर्मितीचे हे सुपरकम्प्युटर असून पंतप्रधानांनी या महासंगणकांचं महत्त्व सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या पाच सुपरकम्प्युटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यातील दोन सुपरकम्प्युटर पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजी (आयआयटीएम) या संस्थांमध्ये बसवण्यात आले आहेत.

ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुण्यातील ‘सी-डॅक’ आणि बेंगळुरू येथील ‘आयआयएससी’ या संस्थांच्या समन्वयातून देशभरातील संशोधन, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांसाठी नॅशनल सुपरकम्प्युटिंग मिशनअंतर्गत (एनएसएम) महासंगणक विकसित करण्यात येत आहेत. सुमारे १३० कोटी रुपये खर्चून या अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेल्या तीन ‘परम रुद्र’ सुपरकम्प्युटरचे गुरुवारी उद्घाटन झाले.

‘जीएमआरटी’ येथे एक पेटाफ्लॉप क्षमतेचा, दिल्ली येथील इंटर युनिव्हर्सिटी ऍक्सिलरेटर सेंटर (आययूएसी) येथे तीन पेटाफ्लॉप, तर कोलकाता येथील एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस येथे ८३८ टेराफ्लॉप क्षमतेचा परम रुद्र सुपरकम्प्युटर बसवण्यात आला आहे. आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले सुपरकम्प्युटर परम रुद्र हे आहेत. पाच वर्षांत एकूण ३२ पेटाफ्लॉप क्षमतेचे सुपरकम्प्युटर ‘एनएसएम’अंतर्गत बसवण्यात आले आहेत.

जलद रेडिओ स्फोटांच्या (फास्ट रेडिओ बर्स्ट- एफआरबी) नोंदी आणि पल्सारच्या अभ्यासासाठी ‘जीएमआरटी’ मधील सुपरकम्प्युटरचा वापर केला जाईल. अकस्मात उत्पन्न होणाऱ्या रेडिओ स्फोटांची नोंद घेऊन त्यांचा संभाव्य उगम शोधण्याचाही प्रयत्न करण्यात येईल.

पुण्यातील ‘आयआयटीएम’मध्ये ११.७७ पेटाफ्लॉप क्षमतेची आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची ‘अर्क’ ही हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग (एचपीसी) यंत्रणा स्थानिक पातळीवरील हवामान अंदाज अचूक वर्तवणाऱ्या मॉडेलसाठी बसवण्यात आली आहे. ८.२४ पेटाफ्लॉप क्षमतेच्या, नोएडातील नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ) येथील ‘अरुणिका’ ‘एचपीसी’चेही उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले.

तब्बल ८५० कोटी रुपयांचा खर्च दोन्ही संस्थांमधील एचपीसीसाठी आला आहे. आता २२ पेटाफ्लॉपची संगणन क्षमता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे असून, प्रचंड नोंदी आणि एआयचा वापर करून येत्या काळात एक किलोमीटर क्षेत्रापर्यंतचे अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.

देशातील तरुण शास्त्रज्ञांना, गुरुवारी उद्घाटन झालेले सुपर कम्प्युटर समर्पित करतो. हे महासंगणक संशोधनात अत्यावश्यक असलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ParamaRudraSuperComputer#PMModiPune
Previous Post

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालेलं ठिकाण साडेतीन वर्षांपूर्वीच आलं होतं चर्चेत!

Next Post

आता सुस्साट होणार मुंबई – पुणे प्रवास!

Next Post
आता सुस्साट होणार मुंबई – पुणे प्रवास!

आता सुस्साट होणार मुंबई - पुणे प्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.