DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ओबीसी समाज लक्ष्मण हाकेंसाठी आक्रमक!

धुळे सोलापूर महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प.

DD News Marathi by DD News Marathi
October 1, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
ओबीसी समाज लक्ष्मण हाकेंसाठी आक्रमक!

जालना प्रतिनिधी :
दि. १ ऑक्टोबर

लक्ष्मण हाके यांच्यावरील वडीगोद्री येथे हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी समाजाने धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलन केले. दोन्ही बाजूची वाहतूक यामुळे ठप्प झाली.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर सोमवारी रात्री पुणे येथे झालेला हल्ला आणि बिनबुडाच्या आरोपाचा ओबीसी समाजाकडून निषेध करण्यात आला. याच बाबीच्या निषेधार्थ आज दुपारी जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी समाज बांधवांनी रस्तारोको आंदोलन केले. ओबीसी समाजाने धुळे ते सोलापूर महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी टायर जाळून महामार्ग रोखून धरला होता. रस्त्यावर काटे टाकून काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धुळे ते सोलापूर महामार्गावर दीडतास रास्तारोको आंदोलन ओबीसी आंदोलकांनी केले. ओबीसी समाजाच्या आंदोलनात यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आणि पुणे येथील घटनेतील आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे असे सांगितल्यावर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला. मात्र, या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

आरक्षणाचा मुद्दा राज्यात ज्वलंत झाला आहे. ओबीसी आणि मराठा समाज अशातच एकमेकांविरोधात उभा राहिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके काल पुण्यात कात्रज कोंढवा परिसरात असताना तिथे असलेल्या मराठा आंदोलकांबरोबर त्यांचा वाद झाला असे समजते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल एक विधान केलेले होते. मराठा आंदोलकांनी यावर आक्षेप घेतला. तसेच मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केले असल्याचा दावा केला.

लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील तरुणांच्या आरोपानंतर यावर उत्तर दिले. माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप केला जात आहे असे हाके म्हणाले. आणखी एक व्हिडिओ हाके यांच्या विधानानंतर समोर आला. लक्ष्मण हाके यांना धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हा वाद आता जाऊन पोहोचला आहे. लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केले आहे का? हे जाणून घेण्यासाठी मराठा आंदोलकांकडून मेडिकल टेस्ट करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. सर्वांचे लक्ष, या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस काय भूमिका घेतात? याकडे लागलेले आहे. काल उशीरा रात्री घडलेल्या घटनेनंतर आज अखेर राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आज ओबीसी समाज लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर एकवटलेला पाहायला मिळाला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #LaxmanHake#marathareservation#OBC
Previous Post

दीपिका पदुकोण रणवीर सिंगची आतुरतेने वाट पाहत आहे कारण तो मुलीच्या जन्मानंतर पुन्हा कामाला लागला आहे!

Next Post

२४ तास हेल्पलाईन नंबर करणार मदत – ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’

Next Post
२४ तास हेल्पलाईन नंबर करणार मदत – ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’

२४ तास हेल्पलाईन नंबर करणार मदत - 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.