DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फिक्स?

मंत्रिपदासाठी संभाव्य ३५ नावं समोर.

DD News Marathi by DD News Marathi
November 28, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फिक्स?

मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ नोव्हेंबर

महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत दाखल होत आहेत. सरकार स्थापन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे याशिवाय मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालं असून सध्या काही नावांची चर्चा आहे, मात्र कुठलेही अधिकृत शिक्कामोर्तब त्यावर झालेले नाही.

फडणवीसांचे नाव अग्रभागी?
भाजपने विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. याशिवाय फडणवीसांच्या नावाला अनेक आमदारांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे असं समजतं की, दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल.

दरम्यान, महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीवारीमुळे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडताना दिसत आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, नव्या फॉर्म्युलानुसार सरकारमध्ये असतील. भाजपचे सर्वाधिक मंत्री नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात असणार असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समसमान मंत्रिपदं देण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे.

भाजपमधून यांच्या नावांची चर्चा –
राहुल कुल, संभाजी पाटील निलंगेकर, गोपीचंद पडळकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, मंगलप्रभात लोढा, राणा जगजितसिंह पाटील, प्रसाद लाड अशा ११ जणांची नावं सध्या समोर आली आहेत.

शिवसेनेकडून यांच्या नावांची चर्चा –
शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची देखील समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या ११ जणांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीतून यांच्या नावांची चर्चा –
अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संग्राम जगताप, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या १३ जणांचा समावेश आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CMofMaharashtra#DevendraFadnavis#Mahayuti
Previous Post

सपा-काँग्रेसशिवाय लढून शिवसेना ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देणार!

Next Post

निवडणूक विजयानंतर, धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंनी कॉल केला व बर्‍याच गोष्टी सुनावल्या. ऐका हा व्हायरल कॉल!

Next Post

निवडणूक विजयानंतर, धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंनी कॉल केला व बर्‍याच गोष्टी सुनावल्या. ऐका हा व्हायरल कॉल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.