मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ डिसेंबर २०२४
तेराव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात, राज्यात २०१९ मध्ये, ‘मी पुन्हा येईन’ असा निर्धार व्यक्त केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरले. पण यांनी अखेर हा संकल्प पूर्णत्वाला नेला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते, अर्थात मुख्यमंत्री म्हणून काल बुधवारी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, फडणवीस आज, गुरुवारी तिसऱ्यांदा घेतील. हा भव्य शपथविधी सोहळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात होईल. भाजप १३२ जागा मिळवून विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तावाटपाची चर्चा लांबल्याने महायुतीच्या सत्तास्थापनेला विलंब होत होता. या दरम्यानच, महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपदावरुन जे नाराजीनाट्य सुरु होतं, ते अखेर संपलं आहे. एकनाथ शिंदे हे आजच्या शपथविधी सोहळ्यात, देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांनंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपदावरुन जे नाराजीनाट्य सुरु होतं, ते, देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांनंतर संपलं आहे. एकनाथ शिंदे हे आजच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास तयार झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स, शपथविधीली अवघे काही तास शिल्लक असताना अखेर संपला आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ ग्रहण करतील. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, या गेले काही दिवस उपस्थित झालेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं असलं आणि आता देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी पण, शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असतानाही एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. बुधवारी भाजपच्या बैठकीत फणवीसांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर फडणवीसांनी दोन वेळा वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, शिंदे गृहमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याने प्रश्न अद्याप सुटलेला नाही असे सूत्रांकडून समजते.