मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ डिसेंबर २०२४
देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. अनेक दिग्गजांची उपस्थिती त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला होती. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र शशांक कुलकर्णीही उपस्थित होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शालेय जीवनाबाबत आणि स्वभावाच्या वैशिष्ट्यांबाबत यावेळी बर्याच विशेष गोष्टी सांगितल्या.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले याचा खूप आनंद असल्याचे असल्याचे सांगून शशांक कुलकर्णींनी आपण २०१४ मध्ये जो शपथविधी झाला त्यासाठीही ते आल्याचे सांगितले. ते आणि देवेंद्र फडणवीस शाळेत बरोबर शिकलो आहोत आणि आमचं राहणंही शेजारी शेजारीच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते दोघे मागच्या ५० वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे असे राजकारणी नाहीत जे कधी कुणाचं वाईट करतील-कुलकर्णी
देवेंद्र फडणवीस असे राजकारणी नाहीत जे कुणाचं कधी वाईट करतील. कुणाला पाडा, कुणाला खाली खेचा असं राजकारण त्यांनी कधीही केलेलं नाही. शालेय जीवनापासूनच ते शिस्तबद्ध आयुष्य जगले आहेत. तसंच आयुष्य ते आत्ताही जगत आहेत. ते कधीच कुणाला पाडा, कुणाला खेचा असं काही राजकारण करत नाहीत. देवेंद्र फडणवीस हे यारों के यार आहेत. देवेंद्र फडणवीस एकदम साधे सरळ राजकारणी आहेत. कुणी गोत्यात येईल असं काही ते करतच नाहीत. आम्ही एकत्र भरपूर अभ्यासही केला आहे. टवाळक्या, मजा मस्तीही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं गणित कच्चं होतं त्यामुळे ११ वीत त्यांनी गणित सोडलं आणि अर्थशास्त्र हा विषय घेतला. बारावीनंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. देवेंद्र फडणवीस बॅकबेंचर वगैरे नव्हते असंही शशांक कुलकर्णींनी सांगितलं.
काम करण्यावर देवेंद्र फडणवीस हे प्रचंड भर द्यायचे. आम्ही शाळेत कधी कधी बसने तर कधी पायी जायचो. शाळेजवळ चुरण, आईसगोळा वगैरे मिळायचा. पण पैसे नसायचे मग बसचे पैसे वाचवून आम्ही ते खायचो. देवेंद्र फडणवीस मस्तीखोरही होते. देवेंद्र फडणवीस जसे राजकारणात आले तसतसे शांत होत गेले. मात्र आजही वेळ मागितला तर ते वेळ देतात. आम्ही अनौपचारिक गप्पा मारल्या की हसून हसून पोट दुखायला लागतं एवढे देवेंद्र फडणवीस मोकळ्या स्वभावाचे आहेत. असं शशांक कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
देेवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय आरोप तर होतातच
देवेंद्र फडणवीसांवर राजकीय आरोप होतात. पण कुणाला पाडायचं वगैरे हे देवेंद्र फडणवीसांच्या रक्तातच नाही. पक्षाने जर देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की दिल्लीला जा तर तो खुशीने जातील. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांमध्ये दम नसतो हे आम्हाला माहीत असतं. असं शशांक कुलकर्णींनी म्हटलं आहे.