मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ डिसेंबर २०२४
महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानभवन प्रांगणात आगमन झाले. आगमनानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार तसेच विधीमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.
‘महायुतीचे’ सरकार स्थापन झाल्यानंतर हे अधिवेशन सुरू होत असून त्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिन्ही मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
बातमी नक्की शेअर करा