क्रीडा प्रतिनिधी :
दि. ११ डिसेंबर २०२४
क्वालालंपूर येथील १० व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारतीय टीमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ५५ पदकांसह, त्यांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून भारताचे नाव वैभवशाली पद्धतीने आणि दिमाखदारपणे जागतिक क्रीडा क्षेत्रावर कोरले आहे! यात त्यांनी ८ सुवर्ण, १८ रौप्य आणि २९ कांस्य पदके पटकावली आहेत. प्रत्येक खेळाडूच्या जिद्द आणि कर्तबगारीने सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतो आहे!
सध्या भारतीय खेळाडू सर्वच क्षेत्रांत अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांची क्षमता आणि तिच्या जोडीला त्यांची जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोन वाखाणण्याजोगा आहे.
क्रीडा संस्कृती वाढवल्याबद्दल आणि आपल्या क्रीडापटूंना अनेकदा असे उल्लेखनीय पराक्रम साधण्यासाठी सक्षम केल्याबद्दल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना धन्यवाद दिले पाहिजेत अशी भावना सर्व थरांतून व्यक्त होत आहे.