DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाने केले पत्रक जारी.

DD News Marathi by DD News Marathi
December 11, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ डिसेंबर २०२४

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ईव्हीएम (EVM) मशिनवर मोठी शंका उपस्थित होत आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत, माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

तसेच, येथील आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. आमचं मत कोणाला पडलं हे कळण्याचा आम्हाला अधिकार आहे, असेही त्यांनी म्हटलं. या वादावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, VVPAT मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे, ईव्हीएमच्या आरोपात कसलेली तथ्य नसल्याचं आयोगाने सांगितल्याचं दिसून येतं.

एकीकडे मारकडवाडी गावात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जुंपल्याचे दिसून येते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मतदानादिनी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत वाढलेल्या मतदानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. या चर्चा आणि गोंधळादरम्यान निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेतील VVPAT मशिनबाबत मोठा खुलासा केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी, भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघ विधानसभा विभागातून 5 मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती. आयोगाने निवडलेल्या या 5 मतदान केंद्रांच्या VVPAT स्लिपची मोजणी करणे अनिवार्य होते. त्यानुसार, येथील VVPAT मशिनची मोजणी करण्यात आली आहे.

23 नोव्हेंबर रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या 5 मतदान केंद्रांची VVPAT स्लिप मोजणी 23/11/2024 रोजी मतमोजणी निरीक्षक/उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 VVPAT युनिट्सची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली गेली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच DEOS कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार VVPAT स्लिपचा काउंट आणि EVM कंट्रोल युनिट काउंटमधील आकडेवारी समसमान आहे त्यामध्ये, कोणतीही तफावत आढळलेली नाही. त्यामुळे, मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मारकडवाडी गावाला भेट देऊन महायुतीचे नेते व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत ईव्हीएमविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध आज महायुतीच्या नेत्यांनीही मारकवाडी गावात भेट देऊन आंदोलन सुरु केले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ECI#ElectionCommission#ElectionCommissioner#maharashtraassemblyelections#rajivKumar#VVPAT
Previous Post

10व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय!

Next Post

ट्रम्प यांच्या सरकारमधील या भारतीय महिलेमुळे भल्या भल्यांना फुटतो घाम!

Next Post
ट्रम्प यांच्या सरकारमधील या भारतीय महिलेमुळे भल्या भल्यांना फुटतो घाम!

ट्रम्प यांच्या सरकारमधील या भारतीय महिलेमुळे भल्या भल्यांना फुटतो घाम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.