DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अजित दादा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीला!

दिल्लीत मोठ्या हालचालींची चाहूल.

DD News Marathi by DD News Marathi
December 12, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
शरद पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अजित दादा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ डिसेंबर २०२४

राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांसह दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी प्रमुख नेते उपस्थित होते. अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांचं पेव फुटलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू असल्याचे संकेत मिळत असल्याने या चर्चा अधिकच रंगल्या आहेत.

आज राष्ट्रवादीचे (SP) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा ८४ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून शरद पवारांची अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी भेट घेतली. दिल्ली येथील ६ जनपथ बंगल्यावर जाऊन सर्व नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळही यावेळी दिसत होते. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवारही यावेळी तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी ट्विट करतही पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. वाढदिवसादिवशी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्लीकडे रवाना झाले होते. मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात अमित शहांसोबतची ही भेट असल्याची चर्चा होती. तथापि अजित पवार कुठल्याही भेटीमध्ये दिसले नाहीत. त्यातच आज गुरूवारी अजित पवार शरद पवारांना भेटायला गेल्याने दोन्ही नेत्यांमध्ये बोलणं सुरू आहे हे स्पष्ट होतं आहे. अजित पवारांच्या ही भेट कौटुंबिक म्हणता येणार नाही, कारण राष्ट्रवादीतील सर्व दिग्गज आणि मोठे नेते, ज्यांचं कोणताही निर्णय घेताना नेहमी मत घेतलं जातं, अशा नेत्यांनीही हजेरी लावल्यानेही वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आलं आहे.

दहा दिवसांआधी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समजत आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राष्ट्रवादीमधील अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील समन्वयक म्हणून प्रफुल्ल पटेल हे काम करताना अनेकदा दिसले आहेत. अजित पवार गटातील बड्या नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे मागील वाढदिवसाला कोणत्याही नेत्याने हजेरी लावलेली नव्हती.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे दरवाजामध्ये स्वागत केलं. सर्वांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून भेटीदरम्यान काय घडलं याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#PrafullPatel#SharadPawar#SharadPawarBirthday
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॉ. माधव गाडगीळ यांचे युएनईपीच्या पुरस्कारासाठी अभिनंदन!

Next Post

विधानपरिषदेतील संख्याबळ समान होताच काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पकडलं कोंडीत!

Next Post
विधानपरिषदेतील संख्याबळ समान होताच काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पकडलं कोंडीत!

विधानपरिषदेतील संख्याबळ समान होताच काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पकडलं कोंडीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.