नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १३ डिसेंबर २०२४
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अगदी तोंडावर आलेला असताना अजित पवार हे मोदींच्या भेटीला गेले आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे अजून भेटीची प्रतीक्षा करत असताना मोदींनी ही वेळ अजित पवारांना तातडीने कशी काय दिली? असा प्रश्न राजकीय वर्तुळात प्रामुख्याने उपस्थित होताना दिसतो आहे. यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
मोदी अजित पवारांना झुकतं माप देणार का? एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त, अजित पवारांचे मंत्री शपथ घेताना दिसणार का? शिंदेंची गरज आता संपली का? असे नानाविध प्रश्न उपस्थित झालेले ऐकिवात येत आहेत. या चर्चा एवढ्या जोरात सुरू असण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंना दोन दिवसांनंतरची वेळ दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे मात्र अजित पवारांना तातडीने भेटण्याची परवानगी मिळाली आहे.