नागपूर प्रतिनिधी :
दि. १४ डिसेंबर २०२४
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांच्या निधन झाले आहे. नागपूरच्या ‘तरुण भारत’मध्ये कित्येक वर्षे ‘शेलापागोटे-सप्रे’ या नावाने त्यांच्या व्यंगचित्रांचे सदर प्रकाशित होत असे. तत्पूर्वी अनेक वर्तमानपत्रात त्यांनी दररोज सदर चालविले. जवळजवळ 50 वर्ष त्यांनी आपल्या व्यंगचित्रांनी वाचकांचे मनोरंजन, प्रबोधन केले. केवळ व्यंगचित्रकार नाही, तर एक रसिक कलावंत म्हणूनही त्यांची चंद्रपूर-विदर्भाला ओळख होती. दुर्मिळ कलात्मक वस्तु, काष्ठशिल्पे त्यांच्या घराची शोभा वाढवित. जगभरातील व्यंगचित्रकारांची चरित्र, त्यांच्या व्यंगचित्रांचे संग्रह असलेले ग्रंथ असे ग्रंथालयच त्यांनी घरात तयार केले होते. त्यांच्या जाण्याने एक संवेदनशील मनाचा कलावंत आपल्यातून निघून गेला आहे अशीच सार्या रसिकांची भावना आहे.