DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड!

तबल्यावर वायुवेगाने फिरणारे हात शांत झाले. 

DD News Marathi by DD News Marathi
December 16, 2024
in ताज्या बातम्या
0
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १६ डिसेंबर २०२४

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. झाकीर हुसैन यांना सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं. त्यांना ‘इडिओपेथिक पल्मोनरी फायब्रोसिस’ नावाचा हातांशी संबंधित आजार झाला होता. या आजारामुळेच उपचारांदरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं. झाकीर हुसैन आणि तबला यांचं नातं ‘दिवा आणि ज्योत’ असं होतं. वडील अल्लाह रख्खा खान यांच्याकडूनच त्यांनी तबलावादनाचे धडे गिरवले होते. हा विनम्र आणि दैवी देणगी लाभलेला कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह रख्खा खान यांचे सुपुत्र होते. झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्यासह तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली. तसंच वयाच्या १२ व्या वर्षापासून झाकीर हुसैन यांनी देशभरात तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती.

१९८८ मध्ये झाकीर हुसैन यांना पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन यांना ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तबला नसांनसांमध्ये भिनलेला आणि रसिकांच्या हृदयात भिनवणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

झाकीर हुसैन यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित रवि शंकर, उस्ताद अमजद अली खान, जॉर्ज हॅरिसन, जॉन मॅक्लॉफ्लिन आणि मिकी हार्ट ऑफ द ग्रेटफुल डेड यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. १९७० मध्ये, त्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन सोबत, “शक्ती” नावाच्या फ्यूजन ग्रुपची स्थापना केली, ज्याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र करून एक नवीन शैली सादर केली.

झाकीर हुसैन यांचं खरं आडनाव कुरेशी असं होतं. मात्र त्यांना हुसैन असं आडनाव देण्यात आलं. झाकीर हुसैन यांनी १९८९ या वर्षी हीट अँड डस्ट या सिनेमातून अभिनय केला होता. २०१६ मध्ये झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबाबा यांनी झाकीर हुसैन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसमध्ये कला सादर करणारे झाकीर हुसैन हे पहिले संगीतकार ठरले. झाकीर हुसैन यांनी १९७८ मध्ये इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुली आहेत. आता झाकीर हुसैन यांच्यानंतर त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #sanfransisco#tablanawaz#ustaadzakirhussain#zakirhussaindies
Previous Post

नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली!

Next Post

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सर्वपक्षीय महिला मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा!

Next Post
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सर्वपक्षीय महिला मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा!

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सर्वपक्षीय महिला मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.