DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बिनविरोध निवड!

दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करीन - राम शिंदे

DD News Marathi by DD News Marathi
December 18, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बिनविरोध निवड!

नागपूर प्रतिनिधी :

दि. १८ डिसेंबर २०२४

भाजपा नेते आणि माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे जी यांची विधानपरिषद सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष व मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, महायुतीचे नेते आदी उपस्थित होते.

कर्जत जामखेड सारख्या ग्रामीण भागातील तळागाळातून आलेले अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व अशी आ. प्रा. राम शिंदे यांची ओळख आहे. ते राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज सुरळीत आणि समन्यायी भावनेतून पार पाडतील, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होते आहे.

“महायुतीचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेचा सभापती म्हणून माझ्या नावाची शिफारस केली. परिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. विरोधकांनी त्याचा मान ठेवत माझ्या निवडीला पाठींबा दिला आहे. याबद्दल महायुती आणि विरोधकांचे मी आभार मानतो. राजकारणात चर्चा महत्त्वाची आहे. मी विधानसभेची निवडणूक हरल्यानंतरही माझे नाव मंत्री, प्रदेशाध्यक्ष यासाठी चर्चेत होते. माझ्या पक्षाला माझ्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी मला योग्य सन्मान मिळवून दिला आहे. त्यांनी दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करीन”, अशी भावना भाजपचे आमदार, विधानपरिषद सदस्य राम शिंदे यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #legislativecouncil#ramshinde#vidhanparishadsabhapati
Previous Post

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या जूनियर महिला हॉकी संघाचा चीनवर ऐतिहासिक विजय !

Next Post

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ फेरीबोट उलटली!

Next Post
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ फेरीबोट उलटली!

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी 'नीलकमल' फेरीबोट उलटली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.